छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळा...(Chhatrapati Shivaji Maharaj Coronation Ceremony)
©Dr.Amit Tukaram Patil:
भाग पहिला (१)
राज्याभिषेक विशेष!
क्षत्रियकुलावतंस श्रीराजाशिवछत्रपती !
(© डॉ.अमित तुकाराम पाटील,
वैद्यकीय अधिकारी गट 'अ',
प्रा.आ.केंद्र भाताणे, जि.पालघर.
मूळ गाव-पाच्छापूर,ता.जत,
जि.सांगली)
आज दि.६ जून...
१६७४ साली आजच्याच दिवशी महाराष्ट्राने 'स्वाभिमान, स्वातंत्र्य आणि स्वराज्य' म्हणजे काय आणि मान ताठ ठेऊन कसे जगायचे याचा आदर्श वस्तुपाठ अखंड भारतवर्षाला घालून दिला!
पूर्वपीठिका-
अतिशय शूरवीर आणि अतिविद्वान शहाजी महाराज व भारताच्या इतिहासातील सर्वांत शूर,बाणेदार, कणखर,सुसंस्कृत आणि ध्येयवादी स्त्री जिजाबाई यांच्या पोटी इ.स. १६३० साली जेव्हा शिवबाचा जन्म झाला, त्यावेळी स्थानिक जनता सामाजिक,धार्मिक व आर्थिक स्वातंत्र्याला मुकली होती. १६ व्या शतकात मोगल प्रबळ झाले होते व त्यांच्या आक्रमणाला तोंड देण्याइतपत दख्खनी पातशाह्या एकजिनसी व सामर्थ्यवान नव्हत्या. दख्खनेत त्यावेळी विजापूरचा आदिलशहा, अहमदनगरचा निजामशहा , गोवळकोंडयाचा कुतुबशहा हे मुस्लिम पातशहा राज्य करत होते. उत्तर हिंदुस्थान विरुद्ध दख्खन असा उघड-उघड लढा व लढाया सुरू होत्या. मोगलांना सबंध भारतावर वर्चस्व प्रस्थापित करायचे होते... मात्र...महाराष्ट्राच्या अवघड भौगोलिक परिस्थितीमुळे व वाहतुकीसाठी हा प्रदेश जास्त गैरसोयीचा असल्याने मुसलमान राजवट खूप खोलवर रुजली नव्हती.
एकूणच,मोगल असो वा दक्षिणेतल्या पातशाह्या; केवळ निजाम वगळता स्थानिक मराठा सरदारांना ह्या दरबारांत मान व अधिकार असा काही नव्हताच.पठाणांचा ओढा आदिलशहाकडे असल्याने निजामाला मात्र मोठ्या प्रमाणात मराठा सरदारांवरच अवलंबून राहावे लागले . त्यापैकीच एक म्हणजे लखुजीराव जाधव -जिजाऊंचे वडील! त्यांच्या आश्रयाने दक्षिणेत येऊन राहिले होते,मालोजी व विठोजी भोसले म्हणजेच शहाजींचे वडील व चुलते!!! मालोजी भोसले अत्यंत पराक्रमी होते, पण ते लखुजी जाधवांच्या नियंत्रणात राहिले. निजामाच्या दरबारात शहाजी व जिजाबाई यांच्या विवाहाच्या निमित्ताने मोठे राजकारण झाले. शेवटी, मुर्तिजा निजामशहाला स्वतःची पातशाही वाचविण्यासाठी दरबारातील अत्यंत शूरवीर अशा मराठा सरदारांमधील विवाहाच्या निमित्तमात्रे होऊ घातलेली भांडणे स्वतःहून सोडविणे भाग पडले. मालोजींना लखुजींच्या समकक्ष आणण्यासाठी त्यांना निजामशहाने बाराहजारी मनसबदारी दिली... अखेर, निजामशहाच्या वैयक्तिक उपस्थितीत हा विवाहसोहळा संपन्न झाला. मालोजींच्या मृत्यूनंतर प्रथम विठोजी व त्यांच्या मृत्यूनंतर वयाच्या १०-१२ व्या वर्षी ही मनसबदारी शहाजी महाराजांकडे आली. निजामशाहीतील अत्यंत प्रबळ, मुत्सद्दी व शूरवीर मलिकअंबरच्या मृत्यूनंतर जेव्हा अत्यंत पात्र म्हणून शहाजीराजांकडे तिची वजिरी आली त्यावेळी निजामशाही +आदिलशाही + कुतुबशाही × मोगल,निजामशाही × आदिलशाही,आदिलशाही × मोगल,आदिलशाही + मोगल × निजामशाही अशा लढाया सतत सुरू होत्या. यांत सर्वाधिक नुकसान झाले निजामशहाला! या लढायांमुळे शहाजीराजांची कीर्ती सर्वत्र पसरली. दख्खनेतील अत्यंत शौर्यवान व मुत्सद्दी सरदार म्हणून त्यांच्या नावाची मोगल व सर्वच पातशाहांनी दखल घेतली.
परकीय सल्तनतींची सततची भांडणे व अंतर्गत वादविवादांनी आलेल्या दुर्बलतेमुळे स्थानिक मराठा सरदारांमध्ये प्रस्थापित राजसत्ता उलथून टाकण्याची महत्त्वाकांक्षा वाढीस लागली. शहाजीराजांनीही असा विचार केला होता;मात्र अत्यंत वेगाने घडणाऱ्या व अनपेक्षित घटनांमुळे ते स्वराज्याची स्थापना करू शकले नाहीत;मात्र तत्कालीन परिस्थितीत सर्वांत बलशाली असल्यामुळे ते नाममात्रच आदिलशहाचे अंकित राहिले.
अशा राजकीय परिस्थितीत शिवाजी महाराज जन्मले व वाढले. आपल्या पतीची स्वराज्य स्थापण्याची इच्छा व आकांक्षा जिजाबाईंनी शिवबाच्या बालमनावर बिंबवली! अशा माता- पित्याच्या पोटी जन्मलेला शिवबा त्यांची ही इच्छा पुढे केवळ ४०-५० वर्षांतच पूर्ण करणार होता..!
©Dr.Amit Tukaram Patil:
मुख्य घटना-
शिवबाच्या बालपणापासून त्याच्या राजकीय, धार्मिक आणि युद्धकलाविषयक उपलब्ध सर्वोत्तम शिक्षणाची सुरुवात शहाजीराजांनी केली होती. जिजाऊ तर त्यांच्या केवळ आईच नव्हे, तर सर्वोत्कृष्ट व सर्वोच्च गुरु होत्या. शिवबासारखा आदर्श पुत्र व विद्यार्थी मिळणे म्हणजे तर अलभ्य लाभ !
©Dr.Amit Tukaram Patil:
शिवबाच्या मनात आपल्या वडिलांचे स्वराज्य-स्थापनेचे स्वप्न पूर्ण करण्याची सुप्त इच्छा कायम ठेवण्याचे काम जिजाऊंनी मनःपूर्वक व अगदी जीव ओतून केले.बुद्धिमान व चतुर शिवबाने लहानपणीच अत्यंत अवघड असा सह्याद्रीचा परिसर आपल्या भावी संकल्पसिद्धीच्या पूर्तीसाठी योग्य असल्याचे ओळखले होते व तो खाचा-खळग्यांसह अक्षरशः पिंजून काढला होता.शहाजीराजांच्या राजकारणातून आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून शिवबाने मुत्सद्दीपणा शिकला. अशा तऱ्हेने एखाद्या राजासाठी आवश्यक गुण शिवबामध्ये लहानपणापासूनच वास करू लागले होते.
©Dr.Amit Tukaram Patil: -वयाच्या १६ व्या वर्षी सन १६४६ मध्ये शिवाजीराजांनी लाच देऊन तोरणा किल्ला कोणत्याही रक्तपाताशिवाय जिंकला व पाठोपाठ राजगड किल्ला जिंकला.रोहिल्यातील बांदल देशमुख स्वराज्याला अनुकूल नसल्याने राजांनी त्याच्यावर अंमल बसवण्यासाठी हे किल्ले जिंकले होते. तर, खाफीखानाच्या मते राजांनी चंदनवंदन किल्ला प्रथम जिंकला होता.
-या यशाने उत्साहित व प्रेरित होऊन महाराजांनी एकापाठोपाठ एक छोटेमोठे किल्ले काबीज करण्याचे सत्र पुढे चालूच ठेवले. यामधील एक समस्या अशी होती की, यांतील बव्हंशी किल्ले आदिलशाही साम्राज्यातील होते. त्याच वेळी शहाजी महाराज आदिलशाहीत मोठे सरदार होते. त्यामुळे आदिलशहाने शहाजी महाराजांकरवी व स्वतंत्रपणेही शिवाजीराजांना नाराजीची व कारवाईची पत्रे पाठवून किल्ले व लगतचा प्रदेश बळकावण्याचे काम थांबवण्याचा इशारा दिला. अखेरीस ,या समस्येवरचा अक्सीर इलाज म्हणून आदिलशहाने सन १६४९ मध्ये शहाजीराजांना कैद केले. शहाजीराजांनी शिवाजीराजांना समजावण्याचा प्रश्नच आला नाही,कारण शहाजीराजांची स्वराज्य स्थापनेची स्वप्नपूर्तीच शिवराय करीत होते. शिवबाच्या मुत्सद्दीपणाचा कस यावेळीच पहिल्यांदा लागला. शिवरायांनी मात्र आदिलशहाला शरण जाण्याचे टाळून मोगलांशी संधान बांधले. याचा एकदम योग्य तो परिणाम आदिलशहावर झाला आणि शहाजी महाराजांची १६५३ मध्ये त्याने सुटका केली. सन १६४९ ते १६५३ या कालावधीत नाइलाजाने किल्ले घेण्याचे काम राजांना थांबवावे लागले. मुत्सद्दीपणाचा आदर्श वस्तुपाठ मात्र यातून राजांनी घालून दिला.
-सन १६५९ मध्ये प्रतापगडाच्या लढाईत आदिलशहाचा बलाढ्य सरदार अफझलखान मारला गेला आणि फेरचढाईत अफझलखानाचा मुलगा मारला गेला आणि आदिलशाही अगदी मुळापासून हादरली.
इतकेच नव्हे,तर याचा असा परिणाम झाला की, राजांची कीर्ती चहुदिशांना पसरली. औरंगजेबाकडून त्यांना शाबासकीचे पत्र आले व मोगलांकडे सरदार म्हणून येण्याचे आमंत्रण धाडण्यात आले.
-त्यानंतर शिद्दी जोहरच्या वेढ्यातून महाराज अतिशयित कष्टाने निसटले. पुढे १६६२ पर्यंत त्यांनी विजापूरकरास हतवीर्यच केले. याच साली शहाजीराजांनी प्रत्यक्ष स्वराज्यात येऊन शिवाजीराजांच्या कर्तृत्वाबद्दल त्यांना शाबासकी दिली.
-सन १६६३ मध्ये प्रचंड सैन्यानिशी येऊन महाराजांचा पराभव करण्यासाठी पुणे प्रांतात उतरलेल्या शाहिस्तेखानाची तीन बोटे सर्वांत सुरक्षित समजल्या जाणाऱ्या व जवळपास लाखभर सैन्याने वेढा दिलेल्या लाल महालातील शयनकक्षातच छाटली. आणि,छाटलेल्या तीन बोटांनी शि-वा-जी ही अक्षरे कायमस्वरूपी त्याच्या ध्यानात राहतील याची तरतूद केली. शौर्याचा आणि गनिमी काव्याचा हा परमोच्च बिंदू मानायला हरकत नाही. अशा रीतीने महाराजांची दहशत सर्वदूर पसरली व धाक वाढला.
-स्वराज्याची आर्थिक घडी नीट बसावी म्हणून व औरंगजेबाच्या नाकावर टिच्चून महाराजांनी १६६३-६४ मध्ये सूरत,बार्सिलोर व आदिलशाहीतील संपन्न हुबळी अशी महत्त्वाची शहरे लुटली व स्वराज्याच्या खजिन्यात भर घातली.
-स्वराज्याची सर्वांत मोठी पीछेहाट मात्र सन १६६५-६६ मध्ये रजपूत सरदार मिर्झाराजे जयसिंग याच्या स्वराज्यावरील स्वारीच्या वेळी झाली. प्रचंड सैन्य व अतिशय अनुभवी अशा मिर्झाराजेंच्या समोर महाराज टिकू शकले नाहीत व योग्य वेळी एक पाऊल मागे घेऊन महाराजांनी युद्ध करून पराभूत होण्यापेक्षा काही किल्ले व प्रदेश देऊन तह केलेला बरा असा विचार करून तह केला. स्वराज्याच्या २३ महत्त्वाच्या किल्ल्यांवर राजांना पाणी सोडावे लागले.
-यातून त्यांना आग्रा भेटीचे आमंत्रण औरंगजेबाने दिले. चांगली माणसे वाईटातल्या वाईट परिस्थितीत देखील संधीचे सोनेच करून दाखवितात ! महाराजांनीही एकूणच आग्रा प्रकरणातून आपल्या मुत्सद्दीपणाचे, चातुर्याचे, हुशारीचे, स्वराज्यासाठी वाटेल तो धोका पत्करण्याच्या तयारीचे व योग्य वेळी अचूक संधी साधण्याच्या कसबाचे केवळ हिंदुस्थानालाच नव्हे तर संपूर्ण जगाला दर्शन घडविले. महाराज सन १६६७ मध्ये अगदी सहीसलामत औरंगजेबाच्या तावडीतून केवळ ९ वर्षांच्या कोवळ्या वयाच्या संभाजीराजांसह सुटले आणि त्यात स्वराज्याच्या एकाही माणसाचा मृत्यू झाला नाही. जगाच्या इतिहासात अशी घटना कधीच घडली नाही!!!
- १६६७-६९ दरम्यान प्रचंड सपाट्याने काम करून महाराजांनी गेलेले सर्व किल्ले परत मिळवले.
- १६७०-७२ मध्ये त्यांनी परत मोगलांचा बराचसा भाग बळकावला.
- १६७३-७४ मध्ये आदिलशाहीवर स्वाऱ्या करून त्यांनी कित्येक किल्ले व प्रदेश आपल्या राज्याला जोडून स्वराज्यविस्ताराचे काम* जोमाने केले.
( ©डाॅ. अमित तुकाराम पाटील,
वैद्यकीय अधिकारी गट 'अ'.
प्रस्तुत लेखक हे स्व.मान.आर.आर.(आबा) पाटील,माजी उपमुख्यमंत्री,महाराष्ट्र राज्य यांचे सख्खे भाचे आहेत.)
©Dr.Amit Tukaram Patil:
भाग दुसरा (२)
राज्याभिषेक विशेष!
क्षत्रियकुलावतंस श्रीराजाशिवछत्रपती!
(©डाॅ.अमित तुकाराम पाटील,
वैद्यकीय अधिकारी गट 'अ',
प्रा.आ.केंद्र भाताणे,जि.पालघर.
मूळ गाव-पाच्छापूर,ता.जत,
जि.सांगली)
राज्याभिषेकाची आवश्यकता-
१. छत्रसिंहासनाच्या धर्मसिद्ध प्रतिष्ठेने हिंदवी राज्यसंस्थेला सांस्कृतिक, राजकीय आणि नैतिक अथवा सामाजिक श्रेष्ठ दर्जा व स्थैर्य प्राप्त होण्याचे सामान्य उद्दिष्ट या राज्याभिषकामागे होते.
२. त्याचबरोबर वर्णाश्रमधर्माच्या आचारवैशिष्ट्यामुळे सोसाव्या लागणाऱ्या अडचणी दूर होणार होत्या,हा प्रत्यक्ष व फार महत्त्वाचा फायदा होता.
राज्य म्हणजे संपादिलेली लहान- मोठी जहागीर म्हणून समजली जात होती. असे लहान मोठे जहागीरदार बरेच होते. त्यात राजांचे जवळचे नातेवाईकही होते. राज्याच्या नियंत्रणाला ही परिस्थिती घातक होती. त्यामुळे राजकारभारांत सुसूत्रता आली नसती. शिस्तीने कारभार चालण्यात अडचणी आल्या असत्या. त्या दूर करण्याची आवश्यकता पूर्वीच भासू लागली होती. 'राजा' या शब्दाने राज्यसंस्थेचा प्रतिनिधी म्हणून जो आदर किंवा पुण्यभाव उत्पन्न व्हावयास पाहिजे होता तो होत नसे.राज्याभिषेक विधीने मात्र महाराजांना वर्णाश्रमधर्म पद्धतीप्रमाणे आपोआपच श्रेष्ठ स्थान प्राप्त होऊन छत्रचामरयुक्त अधिकाराने महाराजास वेगळे स्थान व निराळी कर्तबगारी व्यक्त होणार होती. राजा म्हणविणाऱ्या मराठ्यांना आपल्यासारख्याच एका राजाचे नोकर होण्यात किल्मिष वाटत होते,ते हिंदवी स्वराज्याच्या संघटनेच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक होते.
तसेच ब्राह्मण गुन्हेगारांच्या शासनाबाबत जे परावलंबित्व होते त्यावर अधिकारस्वरुपाने मार्ग शोधणे गरजेचे होते. कोणताही वाद ब्राह्मणांनी उपस्थित केला तर महाराजांनी त्यावर निर्णय घेण्याला रुढीने मान्यता नव्हती. ब्राह्मणांना एकत्र जमवून किंवा काशीस्थित ब्राह्मणांकडून सर्व वाद सोडवावे लागत. ब्राह्मणांना शिक्षा करण्याचा अधिकार महाराजांना नव्हता. या सर्व गोष्टींमुळे अन्य जमातींना ताप होऊन त्यांच्यावर अन्यायही होत असे.
अभिषिक्त राजा म्हणून प्रतिष्ठा नसल्याने महाराजांना सामाजिक व धार्मिक बाबतींत सत्ता नव्हती. रुढींचा हा दंडक राज्यकारभारात आडवा येत होता. अशा परिस्थितीत उभारलेले राज्य वाढत्या तेढीने लयास जाण्याची भीती वाटू लागली. प्रजेलाही हा जाच चांगलाच जाणवत होता.
सारांश...गागाभट्टांची राजांनी राज्याभिषेक करून घेण्याची सूचना राज्यकारभाराच्या दृष्टीने अत्यावश्यक व महत्त्वाची असल्याने पत्नीविरहशोककालातही शिवाजीराजांनी राज्याभिषेकाच्या सांगतेची सिद्धता करवली.
[संदर्भ व उद्धृत-छत्रपती शिवाजी महाराज/उत्तरार्ध,ले.वा.सी.बेंद्रे]
©Dr.Amit Tukaram Patil:
महाराजांच्या समरांगणातील मोठ्या आवाक्यामुळे १६७३-७४ च्या आसपास मोगल,आदिलशहा व कुतुबशहा यांच्या मराठा साम्राज्यावरील मोहिमा एकतर थंडावल्या किंवा बऱ्याच पुढे ढकलल्या गेल्या. औरंगजेब तर महाराजांशी शांतता प्रस्थापित करून साम्राज्याचे होणारे नुकसान टाळण्याचा प्रयत्न करू लागला.
याचदरम्यान काही घटनांमुळे महाराजांच्या मनात राज्याभिषेकाचे विचार डोकावू लागले. स्वराज्याभिषेकाचा निर्धार करून त्या विचारांत गुंग होऊन महाराज निद्रिस्त झाले असता भवानी स्वप्नात येऊन त्यास म्हणाली की,'तू स्वधर्मरक्षणार्थ इतका उद्योग केलास त्यापेक्षा तू सिंहासनाधीश होण्यास योग्य आहेस. तुझा हा हेतू माझ्या प्रसादाने पूर्ण होईल!'
असा साक्षात्कार झाल्यानंतर त्यांनी जिजाबाईंचा सल्ला घेतला असता,त्यांनीही परवानगी दिली.
तसेच,रामदास स्वामी यांनीही या विचारास निःसंदिग्ध अनुकुलता दर्शविली.
अडचणी-
हा विधी सशास्त्र करावयाचा असल्यास कोणकोणत्या गोष्टींची अनुकूलता व सिद्धता पाहिजे यासंबंधी जाणकारांचे मत घेता,महाराजांस असे समजले की,ज्याचा व्रतबंध झाला आहे त्यालाच राज्याभिषेकविधी शास्त्रानुसार करता येतो. महाराजांचा हा विधी झाला नसल्याने पंडितांच्या मते त्यांची गणना शूद्रांत होत असे. विवाह होऊन संततीही झालेल्या महाराजांचा त्यांच्या वयाच्या ४६ वर्षी असा विधी शक्य होणार नाही असे पंडितांचे मत पडले.
त्यासमयी महाराजांकडील अत्यंत हुशार, प्रामाणिक आणि स्वामिनिष्ठ सेवक बाळाजी आवजी चिटणीस यांनी महाराजांस अशी मसलत दिली की, चार वेद, सहा शास्त्रे व अनेक वैदिक ग्रंथांचे सांगोपांग अध्ययन करून महापंडित झालेल्या व ज्यांनी सांगितलेला शास्त्रार्थ इतर ठिकाणच्या मोठमोठ्या पंडितांस शिरसावंद्य होतात असा अधिकार असणाऱ्या व काशीमध्ये राहणाऱ्या गागाभट्टांचा या संदर्भात अभिप्राय घ्यावा.१६७३ च्या अखेरीस किंवा १६७४ च्या आरंभीस गागाभट्ट पैठणला आले होते. महाराजांनी अत्यंत विनम्रपणे गागाभट्टांना दरबारात बोलावून घेतले व त्यांचा यथोचित आदरसत्कार केला. गागाभट्ट महाराजांची कीर्ती आधीपासूनच जाणून होते,त्यात महाराजांच्या या विनम्रतेने ते भारावून गेले.
त्यांनी यावर अशी मसलत दिली की , शिवाजी महाराज ज्या शिसोदे वंशातील आहेत, त्या राजपूत घराण्यातील राजे आजही शास्त्रोक्त पद्धतीने राज्याभिषेक करुन घेतात, त्यामुळे मध्यंतरीच्या काळात जरी भोसले कुळाने व्रतबंधादी धार्मिक विधीस फाटा दिला असला तरी,त्यांचे क्षत्रियत्व नष्ट होत नाही. तसेच, व्रतबंधविधी हा राज्याभिषेक विधीचाच एक भाग समजून महाराजांस तो करता यईल.
यानंतर गागाभट्टानी स्थानिक पंडितांच्या बरोबर विद्वत्सभा घेऊन वादविवाद केले असता, त्यांनीही गागाभट्टाचे म्हणणे मान्य केले.
यादरम्यान १६ मार्च,१६७४ रोजी महाराजांच्या पत्नी काशीबाई निवर्तल्या. त्यांचे दिवसकार्य २८ मार्चला संपणार होते. त्यामुळे सर्वजण दुःखात जरी असले तरी राज्याभिषेकाच्या तयारीचे काम मात्र चालूच ठेवण्यात आले होते.
राज्याभिषेक करणे निश्चित झाल्यानंतर महाराजांनी मोठमोठ्या विद्वान ज्योतिषांस सशास्त्र सुमुहुर्त पाहावयास सांगितले. त्यांच्या अनुमताने ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी (आनंदनाम संवत्सर) हा सुमुहुर्त सिद्ध झाला.
(© डॉ. अमित तुकाराम पाटील,
वैद्यकीय अधिकारी गट 'अ'.
प्रस्तुत लेखक स्व.मान.आर.आर.(आबा) पाटील,माजी उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांचे सख्खे भाचे आहेत.)
©Dr.Amit Tukaram Patil:
भाग तिसरा (३) (अंतिम)
राज्याभिषेक विशेष !
क्षत्रियकुलावतंस श्रीराजाशिवछत्रपती!
(© डॉ.अमित तुकाराम पाटील,
वैद्यकीय अधिकारी गट 'अ',
प्रा.आ.केंद्र भाताणे, जि.पालघर.
मूळ गाव-पाच्छापूर,ता.जत,
जि.सांगली)
पूर्वतयारी-
राज्याभिषेकाबाबत गुप्तता राखणे राजकीयदृष्टया आणि इस्लामी सत्तांच्या या बाबतीतील हळुवारपणाचा विचार केल्यास, आवश्यक होते.
राज्याभिषेकाची तयारी मार्चपूर्वीच सुरू करण्यात आली होती.
महानद्या म्हणजेच कृष्णा, गोदावरी, यमुना, गंगा व कावेरी यांची व सागरांची जले जमविण्यासाठी लोक पाठविले गेले होते. सिंहासन कलाकुसरीचे करावयाचे असल्याने त्याचे काम आधीच सुरू केले गेले होते. सुलक्षणी अश्व व हत्ती, व्याघ्रचर्मे, मृगचर्मे आदी आणवली गेली. सोन्याचे, चांदीचे व ताम्राचे कलश व इतर पात्रे तयार करवली.
राज्याभिषेक चातुर्मासापूर्वीच उरकून घेणे आवश्यक झाल्यामुळे, अगदी शेवटचाच मुहुर्त धरला गेला होता.
कौटुंबिक व राजकीय अडचणींमुळे महाराजांचे व्रतबंधन व पत्नीशी पुन्हा समंत्रक विवाह अगदी शेवटच्या दिवशी करवून घेतले गेले.
२४ फेब्रुवारीला स्वराज्याचे सरसेनापती प्रतापराव धारातीर्थी पडले (वेगात मराठे वीर दौडले सात)!
१६ मार्च रोजी महाराजांच्या पत्नी काशीबाई वारल्या.
एवढ्या अडचणींनंतरही राजांनी राज्याभिषेक लांबणीवर न टाकता तो विष्णुसुशुप्तीच्या पूर्वी उरकून घेतला.
ठिकाण-
जेथे सिंहासन स्थापावयाचे ते राजधानीचे स्थल पुण्यभूमी असून त्याच्या आसमंतात्भागी पुण्यक्षेत्रे व महानदी असावी, तेथे विपुल उदक असून पुष्करिण्यादी कृत्रिम जलाशय असावे,त्याच्या सभोवतालील प्रदेशांत नाना तऱ्हांची धान्ये उत्पन्न होत असावीत,ते स्थल शत्रूंस दुःसाध्य असावे,असे शिष्टजनांनी सुचविल्यावरून 'रायगड' किल्ला ह्यांपैकी बहुतांश लक्षणांनी युक्त असून,शत्रूंस दुःसाध्य असे स्थल स्वराज्यात दुसरे कोणतेही नाही असे ठरले व ह्या गडावर राज्याभिषेक समारंभ करण्याचा निश्चय झाला.
[संदर्भ व उद्धृत- छत्रपती शिवाजीमहाराज,ले.कृ.अ.केळुस्कर]
या गडावर महाराजांनी मोठा उत्तम वाडा बांधला होता. तसेच अठरा कारखाने,अष्टप्रधानमंडळातील मंत्र्यांची निवासस्थाने व सिंहासनासाठी सभागृह बांधले होते. ते इतके मोठे होते की त्यात हजारो माणसांचा समावेश झाला असता.
या सर्व व्यवस्थेवरून याच गडावर गादी स्थापण्याचा महाराजांचा इरादा होता,हे स्पष्टपणे जाणवते.
©Dr.Amit Tukaram Patil:
आमंत्रितांची व्यवस्था-
राज्याभिषेकासाठी आपले आप्त, सुहृद व ब्राह्मणांना सहकुटुंब, सपरिवार आमंत्रण होते. परकीय सत्तांचे वकील व प्रतिनिधी,विद्वान,आमंत्रितांच्या मनोरंजनाकरिता गायक,नर्तिका व इतर कलाकार यांच्याबरोबरच सामान्य जनतेलाही या सोहळ्याचे आमंत्रण होते.
सर्वांच्या राहण्याची व खाण्यापिण्याची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. ब्राह्मणभोजनासाठी एकेएके जागी पाचपाच हजार ब्राह्मणांच्या पंक्ती बसाव्या अशी दहा स्थळे होती.
कोणासही अन्न कमी पडू नये म्हणून धान्यादिकांची पर्वतप्राय कोठारे करवून त्यांवर अधिकारी नेमले व त्या सर्वांवर अध्यक्ष नेमला. सर्व अधिकाऱ्यांच्या हाताखाली अनेक कारकून व नोकर ठेवण्यात आले होते,इतकी व्यवस्था चोख ठेवण्यात आली होती.
©Dr.Amit Tukaram Patil:
विधीस सुरुवात-
• शुक्रवार, २९ मे १६७४-
"ज्येष्ठ शुद्ध ४ घटी ५ राजश्रीची मुंज झाली."
याच दिवशी 'तुलापुरुषदान,सुवर्णादि तुलादान' झाले.
महाराजांचे वजन १६० पौंड (१७००० पगोडे) भरले.
• शनिवार, ३० मे १६७४-
"ज्येष्ठ ६ शनिवारी समंत्रक विवाह केला."
राज्याभिषेकविधि प्रारंभः प्रथम दिनः लग्नविधी झाल्याने वैदिक पद्धतीप्रमाणे राज्याभिषेक विधी सपत्निक करण्यास शास्त्रानुसार मोकळीक झाली.
• रविवार, ३१ मे १६७४ः द्वितीय दिनः -
पूर्व रात्री महाराजांनी फलशाकाहार,भूशय्या व ब्रह्मचर्य पाळले. दुसऱ्या दिवशी इंन्द्रियशांतीचे कार्य ठरल्याप्रमाणे संकल्प करून व तत्संबंधी विधी करून कार्यारंभ करण्यात आला.
• सोमवार, १ जून १६७४: तृतीय दिन: -
यादिवशी ग्रहयज्ञ,नक्षत्रहोम व ब्राह्मणभोजन इत्यादी विधी झाले.
• मंगळवार, २ जून १६७४: चतुर्थ दिन: -
शुभकार्यासाठी निषिद्ध दिन
• बुधवार, ३ जून १६७४: पंचम दिन: -
या दिवसाचे कार्य 'ऐन्द्रीशांत्यङ्गत्वेन नक्षत्रयज्ञं करिष्ये' या संकल्पाने सुरू झाले व उत्तरपूजेनंतर संपले.
• गुरुवार, ४ जून १६७४: षष्ठम दिन: -
रात्री निर्ऋतियाग. पक्व,अपक्व मांस,मत्स्य व सुरा यांचे बलिदान झाले.
• शुक्रवार, ५ जून १६७४: सप्तम दिन: -
प्रथम इंद्रियशांतीचे कार्य झाले.
अयुत,सहस्र किंवा शत ब्राह्मणभोजन झाले व सपत्नीक कर्मसंपूर्णता वाचली.
नंतर _मुख्य राज्याभिषेकावधीस प्रारंभ झाला. शुक्रवारी २२ घटिका ३५ फळें द्वादशी होती. त्रयोदशीचा मुहूर्त असल्याने सायंकाळपासून पहाटेपर्यंत हा धार्मिक विधी चालला. राज्याभिषेक,सिंहासनारोहण व राजदर्शन असे तीन समारंभ त्रयोदशीस झाले.त्रयोदशी शनिवारी (६ जून,१६७४) १९ घटिका ४९ पळेपर्यंत होती.
त्रयोदशीच्या या सुमंगल दिनी अष्टप्रधानमंडळाची योजना करून त्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. या सर्वांनी व महाराजांनी मंगलस्नान केले.नंतर प्रथम गणेशपूजन,स्वस्तिवाचन,मातृकापूजन,वसोद्धारपूजन झाल्यावर नांदीश्राद्ध,नारायणपूजन व आज्य होम केला. आज्याहुती दिल्यावर राज्याभिषेकविधीस प्रारंभ झाला. महाराज सपत्नीक आल्यावर मंडपपूजा झाली. त्यानंतर महाराज आसनावर बसले. पट्टराणी सोयराबाई पटबंधन करून जवळ बसल्या व युवराज संभाजीही सन्निद्ध बसले. आसनाच्या डाव्या व उजव्या बाजूस मानाप्रमाणे प्रत्येकी चार मंत्री अशा रीतीने अष्टप्रधान मंडळ उभे राहिले.
महावेदीभोवती पूर्वेस सुवर्ण कुंभ,दक्षिणेस रजत कुंभ, पश्चिमेस ताम्र कुंभ व उत्तरेस मातीचे कुंभ ठेऊन त्यांतील एकेकांत घृत,दुग्ध,दधि व जल भरले होते.
गागाभट्टांनी सर्व विधी भोसल्यांचे कुलोपाध्ये व पुरोहित प्रभाकरभट्टांचे पुत्र बाळंभट यांचे हस्ते करविला. गागाभट्ट जवळ मार्गदर्शन करीत बसले होते. अनेक पढिक व वेद जाणणारे ब्राह्मण बाळंभटांच्या साह्यास दिले होते.
गागाभट्टांच्या पोथीवरून सर्व विधी मोठ्या समारंभाने,गांभीर्याने व वेदघोषांत यशस्वीपणे पार पडला.
'राजदर्शनसमारंभ' ६ जून रोजी सकाळी ७-८ च्या सुमारास करण्याचे ठरले असावे.
शनिवारी पहाटे 'सिंहासनारोहण' विधी झाला.
[संदर्भ व उद्धृत-छत्रपती शिवाजी महाराज/उत्तरार्ध (वा.सी.बेंद्रे) आणि छत्रपती शिवाजीमहाराज (कृ.अ.केळुस्कर)]
अशा रीतीने स्वराज्याच्या पहिल्या छत्रपतींचा राज्याभिषेक विधी पार पडला व अखिल हिंदुस्थानात स्वकीयांची (व हिंदू) पदपातशाही दिमाखाने उभी राहिली.
©Dr.Amit Tukaram Patil: महाराजांनी 'क्षत्रियकुलावतंस श्रीराजाशिवछत्रपती' असा किताब धारण केला व शिवशक सुरू केले.
गागाभट्टांस १ लक्ष होनांची दक्षिणा देण्यात आली.
या राज्याभिषेकासाठी एकूण खर्च १ कोटी ४२ लक्ष होन इतका झाला.
महाराजांच्या राज्याभिषेकानंतर केवळ १२ दिवसांतच,१८ जूनला राजमाता जिजाबाई स्वर्गवासी झाल्या. पुढील सुमारे चार महिने महाराज रायगडावरच राहिले व त्या कालावधीत शोक व्यक्त करण्याचा एक भाग म्हणून ते सिंहासनावर बसले नाहीत.महाराजांची मातृभक्ती किती निःसीम होती हे आणखी एकदा लोकांच्या नजरेस उत्तम प्रकारे आले.
महाराजांच्या राज्याभिषेकाची बातमी कालांतराने यवनपातशहांस कळले तेव्हा ते अतिशयित खिन्न झाले. ह्यानंतर सर्व रजपूत राजे व इंग्रज,डच,फ्रेंच,फिरंगी वगैरे परदेशस्थ लोक महाराजांस विशेष मान देऊ लागले हे उघडच आहे; पण आदिलशहा,कुतुबशहा व मोगल बादशहा यांसही आता महाराजांना बरोबरीचा मान देणे प्राप्त झाले.
ह्यापूर्वी एकंदर लोकांस त्यांचा धाकच विशेष वाटत असे; परंतु आता धाक व मान या दोन्ही वृत्ती त्यांच्या ठायी उत्पन्न झाल्या.
एकूणच,सभासदाच्या भाषेत बोलायचे तर, "मऱ्हाटा पातशहा येवढा छत्रपती झाला ही गोष्ट कांही सामान्य नाही."
(© डॉ. अमित तुकाराम पाटील,
वैद्यकीय अधिकारी गट 'अ'.
प्रस्तुत लेखक स्व.मान.आर.आर.(आबा) पाटील, माजी उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांचे सख्खे भाचे आहेत.)

Khupach bhari amit..mahitipurn
ReplyDeleteधन्यवाद संतोष.
ReplyDelete@ amit patil
ReplyDeleteअप्रतीम
Excellent...
ReplyDeleteThanks a lot
Delete