सातत्य आणि चिकाटी हाच असतो यशाचा खरा राजमार्ग ..! Consistency and perseverance are the highways to success..!

Dr. Amit Tukaram Patil:
🔴🔵🔴🔵🔴🔵🔴🔵🔴🔵
*सातत्य आणि चिकाटी हाच असतो यशाचा राजमार्ग!!!

(© डॉ. अमित तुकाराम पाटील,
वैद्यकीय अधिकारी गट 'अ',
प्रा.आ. कें.भाताणे, जि. पालघर)
🔴🔵🔴🔵🔴🔵🔴🔵🔴🔵

🔘 _भारतात शिक्षणाचा आणि प्रशासनाचा दर्जा उच्च नसला_ तरी (मान्य नसल्यास जगभरातील टॉप १०० विद्यापीठांत भारतातील आय.आय.टी.,आय.आय.एम.सह एकाही विद्यापीठाचा समावेश नसल्याच्या जागतिक दर्जाच्या अहवालाचे स्मरण करावे...आणि,प्रशासनाच्या लालफितीच्या कारभाराचा अनुभव व बोकाळलेल्या भ्रष्ट व्यवस्थेबद्दल सूज्ञास सांगणे न लगे!...असो,तो लेखाचा विषय नाही;त्यावर पुन्हा कधीतरी!); विविध प्रवेश परीक्षा,पात्रता परीक्षा व स्पर्धा परीक्षा यांचे आकर्षण वाढतच आहे. आणि _परीक्षा म्हटले की, स्पर्धा आलीच_...या स्पर्धेचा शेवट होतो तो एकतर यशाने किंवा अपयशाने. घवघवीत यश मिळाले तर उत्तमच; _पण सगळेच यशस्वी झाले तर मग परीक्षेचे महत्त्व काय?_ ➡सगळ्यांनाच यश मिळू लागले की मग त्याचा सध्याच्या महाराष्ट्र बोर्डाच्या दहावीच्या परीक्षेसारखा खेळखंंडोबा व्हायला वेळ लागत नाही. (यंदा दहावीत ९०℅ च्या पुढे गुण प्राप्त केलेली सुमारे ५१,००० मुले आहेत!!!)

➡ *शेवटी,अपयश आहे म्हणूनच यशाला महत्त्व आहे.* अपयश आले की नैराश्य येेते आणि नैराश्यातून पुन्हा अपयश येतो,ज्यामुळे माणूस खचून जातो,निरुत्साही होतो. *अपयश (failure)-नैराश्य (frustration)-अपयश-नैराश्य असे दुष्टचक्र (vicious cycle) चालू होते.* *_मात्र, अपयश पचविणे हे यश पचविण्याएवढे अवघड नसते_* हे इथे लक्षात घेणे गरजेचे आहे. यश पचविणे हे महाकर्मकठीण काम! अपयशातून तावून-सुलाखून बाहेर पडणारा माणूस पूर्वीच्या चुकांतून शिकून व परत जास्त कष्ट करून चिकाटी आणि जिद्दीच्या बळावर सोन्यासारखी झळाळी प्राप्त करू शकतो;पण...पण,हा 'पण' इथे आडवा येतो आणि _बहुतेक वेळा अपयशी माणसे प्रयत्न करायचेच सोडून देतात_ आणि किड्या-मुंगीसारखे आयुष्य जगून या जगातून निरोप घेतात. अपयशी माणसांना काही सल्ला देण्याइतपत मी काही मोठा नाही आणि तेवढा माझा अधिकार तर नाहीच नाही.
हा लेखप्रपंच करण्याचे करण्याचे कारण म्हणजे, *माणसाला जेव्हा अवघड परिस्थीतून बाहेर पडायचा मार्ग दिसत नाही त्यावेळी त्याने सरळ निसर्गाला शरण जावे.* माणसाच्या बव्हंशी प्रश्नांची उत्तरे निसर्गात असतात; पण आपण त्यांचा विचार करत नाही.

➡ *आपल्यापैकी जवळजवळ प्रत्येकाला डोळे आहेत; पण 'दृष्टी' मात्र खूपच थोड्या जणांकडे असते.*
➡ _'सुखाचा सदरा सापडणे' जसे शक्य नाही तसेच यशाचा एखादा निश्चित राजमार्ग सापडणेअवघड आहे._ पण काही गोष्टींचे पालन केल्यास यश मिळविणे सुलभ होते.

©Dr. Amit Tukaram Patil:
🔘 *ज्ञान,जिद्द,चिकाटी,सातत्य, अंगभूत कौशल्ये,उत्कृष्ट निरीक्षणक्षमता,प्रयत्नांची पराकाष्टा करण्याची क्षमता,सराव यांसारख्या गोष्टी यशप्राप्तीसाठी आवश्यक ठरतात.* यातल्या प्रत्येक घटकाचे कमी-अधिक महत्त्व आहे. अपयशी झालेली माणसे स्वतःचे प्रयत्न कमी पडले किंवा आपले ज्ञानच कमी आहे,ही अपयशाची कारणे मानत नाहीत. ती एकतर परीक्षापद्धतीला दोष देतात, परिस्थितीला दोष देतात किंवा आपली जन्मजात बुद्धिमत्ताच कमी असल्याची सबब पुढे करतात. पण, हे अंशतःच खरे आहे.
➡ जगभरातील यशस्वी माणसांची उदाहरणे पाहिली तर *जन्मजात बुद्धी किंवा परिस्थितीपेक्षा प्रयत्नांतील सातत्य, चिकाटी,जिद्द व न थकता परिश्रम करण्याची क्षमता याच गोष्टी यशप्राप्तीसाठी निर्णायक ठरतात* असे दिसून येते.

🔘 परवा 'नॅशनल जिओग्राफीकवर' (हल्ली टी.व्ही. वरील कार्यक्रमांत बातम्या विनोदी कार्यक्रमांसारख्या वाटतात, तर विनोदी कार्यक्रम बातम्यांसारखे वाटतात... अशा जमान्यात डिस्कव्हरी,नॅशनल जिओग्राफीकच आधार वाटतात!) काही कार्यक्रम पाहताना निसर्गातील एक उदाहरण दिसले ज्यात सातत्य व चिकाटीचे महत्त्व अधोरेखित झाले आहे.

©Dr. Amit Tukaram Patil
🔘 मांसाहारी प्राण्यांना दुसऱ्या प्राण्यांची शिकार करून त्यांना खाऊन जगतात हे आपल्याला माहिती आहेच.
या मांसाहारी प्राण्यांचे मुख्यतः दोन प्रकार असतात- मार्जार (मांजर) वर्गीय व श्वान (कुत्रा) वर्गीय !
मार्जारवर्गात वाघ,सिंह अशा शक्तिशाली प्राण्यांचा समावेश होतो तर श्वानवर्गीय प्राण्यांत जंगली कुत्रे,लांडगे,कोल्हे,तरस इत्यादी प्राणी समाविष्ट असतात.

➡ दोन्ही वर्गांतील प्राणी शिकार करतात पण; आश्चर्याची गोष्ट म्हणजे *शिकारीत यश मिळण्याचे प्रमाण (success/strike rate) ताकदवान अशा सिंहांपेक्षा जंगली कुत्र्यांमध्ये जास्त असते.*

🔘 सिंह (खरे तर सिंहिणी) कळपाने शिकार करतात. एका कळपात जवळपास १० ते १२ सिंह-सिंहिणी असतात. एका सिंहाचे वजन २५० ते ३०० किलोपर्यंत असते. सिंह सशापासून हत्ती व जिराफासारख्या प्राण्यांच्या शिकारी करतात. दबा धरून अचानक ताकदवान हल्ला करणे हे त्यांचे वैशिष्ट्य (USP)! त्यांच्या शिकारीचे वजनही ५००  ग्रॅमपासून १००० किग्रॅपर्यंत असू शकते.
सिंहाचा जबडा हा पृथ्वीवरील सर्वांत मोठा सजीव असणाऱ्या व्हेल माश्याच्या जबड्यापेक्षाही जास्त ताकदवान असतो.
इथे शिकारी आणि (भक्ष्य) शिकार यांच्या जास्तीत जास्त वजनाचे गुणोत्तर असते १ः४.
➡ _अशा या जंगलाच्या 'राजा'चा यशस्वी शिकार करण्याचा दर (success/strike rate) मात्र दर १० प्रयत्नांपैकी २ ते ३ इतका सामान्य असतो,_ म्हणजेच २०-३०%.

© Dr. Amit Tukaram Patil:
🔘 जंगली कुत्रेही कळपात राहतात आणि त्यांच्या कळपात १०-१५ कुत्रे असतात. एका कुत्र्याचे वजन असते जास्तीत जास्त ३० किलो. कुत्रेही सशापासून ते मध्यम आकाराच्या जंगली म्हशींची शिकार करतात. कुत्र्यांच्या शिकारीचे वजन ५०० ग्रॅमपासून ते ७५० किग्रॅपर्यंत असू शकते. कुत्रे दबा धरून जास्त वेळ थांबू शकत नाहीत, ते त्यांचे वैशिष्ट्य नव्हे! कुत्रे उघड हल्ला चढवतात. कुत्र्यांचा जबडाही अतिशय ताकदवान (strong point) असतो. इथे शिकारी आणि भक्ष्य (शिकार) यांच्या जास्तीत जास्त वजनाचे गुणोत्तर असते १ः२५.
➡ अशा या _जंगलातील सर्वार्थाने 'लहान' 'प्रजे'चा यशस्वी शिकार करण्याचा दर (success or strike rate) असतो प्रत्येकी १० प्रयत्नांपैकी ८ ते ९ शिकारी,_ म्हणजेच ८०-९० %.
आहे की नाही आश्चर्य ?!

©Dr. Amit Tukaram Patil:
➡ असे का होत असेल याचा आपण थोडा विचार करू.
🔘 *ताकद व वजनाने कमी असे जंगली कुत्रे सिंहांपेक्षा जास्त यशस्वी का ठरतात?*
याचे कारण म्हणजे *_चिकाटी, सातत्यपूर्ण प्रयत्न करण्याची व न थकता ध्येयाचा पाठलाग करण्याची कुत्र्यांची क्षमता !_*

सिंह आपल्या भक्ष्याचा पाठलाग जास्तीत जास्त १ किमी करू शकतात. त्यानंतर ते थकतात आणि पाठलाग करायचा सोडून देतात. एवढ्या अंतरात भक्ष्य सापडले तर ठीक नाहीतर मग त्यांना उपाशी रहावे लागते. वापरलेली ऊर्जा वाया जाते (unfruitful loss of energy). आणि, पोट भरण्यासाठी दुसऱ्या भक्ष्याला मारण्यासाठी परत पहिल्यापासून तयारी व पाठलाग करावा लागतो.

©Dr. Amit Tukaram Patil:
🔘 कुत्रे मात्र धावतात...धावतात... न थकता *धावतच राहतात* (persistence). आणि, हीच गोष्ट त्यांना यशाची हमी देते. कुत्रे न थांबता सलग ३०-३० किमी धावू शकतात. भक्ष्याचा पाठलाग चालू ठेवतात. भक्ष्याचा वेग (speed) किंवा ताकद (strength) कुत्र्यांपेक्षा जास्त असते. पण, कुत्र्यांच्या धावण्यात वेग टिकवून ठेवण्याची क्षमता व सातत्य (perseverance and consistency) या गोष्टी असतात. तसेच, कळपाच्या प्रमुख मादीकडे निर्णायकी नेतृत्व (decisive and empowered leadership) असले तरी पाठलाग करणाऱ्या कुत्र्यांच्या जागा (assignment of specific work and order for each member of the group) ते थकतील त्या क्रमाने आळीपाळीने बदलत जातात (division of work among members of the group). सिंहाच्या कळपात मात्र प्रत्येकाची जागा कायमस्वरूपी (rigidly fixed) असते; थकलेल्या सदस्याला बदलण्याची सोय नसते (no appropriate replacement),ज्यामुळे सगळा कळप एकदमच थकतो. म्हणूनच भक्ष्य वेगवान किंवा ताकदवान असले तरी कुत्रे त्याला पळवून पळवून थकवतात (draining the energy of your prey/target), त्याच्या धावण्याच्या सर्वोच्च क्षमतेचा कस लावतात आणि *असा एक निर्णायकी क्षण आणतात (threshold of success), की जो गाठताच भक्ष्य अलगद जाळ्यात अडकते.* आणि, हे सर्व करताना त्यांना लपूनछपून (backstabbing) किंवा धूर्तपणे (cunningness) हल्ला करावा लागत नाही. पुढे, भक्ष्याचे परतण्याचे सर्व मार्ग बंद होतात किंवा केले जातात (no point of return) आणि त्याची शिकार होते. म्हणून कुत्रे शिकार करताना सिंहांपेक्षा जास्त यशस्वी ठरतात (superior success rate).

*_एकाच्या (शिकाऱ्याच्या) जेवणाचा प्रश्न दुसऱ्याच्या (भक्ष्याच्या) जीवनाचा (खरेतर, जीवनमरणाचा) प्रश्न ठरतो._*

यशस्वी होण्यासाठी किती कष्ट करावे लागत असतील व त्यात किती सातत्य ठेवावे लागत असेल तर ते *_भक्ष्यापेक्षा ( प्रतिस्पर्ध्यापेक्षा)  (target or competitors) केवळ एक पाऊल जास्त चालण्याचे / धावण्याचे / सातत्य टिकविण्याचे!_* (You just need to run a single moment more and a single step farther than your prey/target.)

🔘 _जन्मजात कौशल्य,प्रचंड शारीरिक/बौद्धिक ताकद किंवा अनुकूल परिस्थितीपेक्षासुद्धा_ *_प्राप्त परिस्थितीत प्रचंड कष्ट करून, प्रयत्नांत सातत्य, चिकाटी व जिद्द ठेवून अविश्रांतपणे ध्येयाचा विचलित न होता पाठलाग करण्याची क्षमताच अंतिमत: तुम्हाला विजयाकडे नेऊन यशस्वी बनविते._*
🔴🔵🔴🔵🔴🔵🔴🔵🔴🔵
(©डॉ. अमित तुकाराम पाटील ,
वैद्यकीय अधिकारी गट 'अ',
प्रा.आ. केंद्र भाताणे, जि.पालघर.
मूळ गाव- पाच्छापूर,ता.जत ,
जि. सांगली)
(प्रस्तुत लेखक हे स्व.मान.आर.आर. (आबा) पाटील, माजी उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, यांचे सख्खे भाचे आहेत.)
🔴🔵🔴🔵🔴🔵🔴🔵🔴🔵

Comments

  1. very inspirational to the student who are preparing for competitive exams....!

    ReplyDelete

Post a Comment