गुरुपौर्णिमा...Gurupournima! (Gratitude towards teacher)
*गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!*
( *डॉ.अमित तुकाराम पाटील,*
*वैद्यकीय अधिकारी गट 'अ'*,
प्रा.आ.केंद्र भाताणे,ता.वसई,
जि.पालघर.
*पाच्छापूर,ता.जत,जि.सांगली*)
मला सर्व *चांगली जीवनमूल्ये शिकवणारे माझे पहिले गुरू* असणाऱ्या *_आई-पप्पांपासून_*,मला शांतपणे वागायला आणि एखाद्या घटनेकडे तटस्थपणे बघायला व आहे त्या परिस्थितीत शिकवणाऱ्या *_माझा छोटा भाऊ उदयपर्यंत_*...
*अंगणवाडीत* मला शिकवणाऱ्या *_शोभा बाईंपासून_* मला *वैद्यकीय शाखेत* मनापासून शिकवणाऱ्या आणि माझ्यावर व माझ्या ज्ञानावर प्रेम करणाऱ्या माझ्या *_अभियांत्रिकी व वैद्यकीय शाखेकडील सर्व शिक्षक_*; विशेषतः *_डॉ.आरगे,डॉ.चंद्रकांत पाटील, डॉ.पत्की सरांपर्यंत_*...
मला *ऑटोक्लेव्ह* कसा लावायचा हे दाखविणाऱ्या *_गगनबावडा ग्रामीण रुग्णालयातील अनिल लोहारपासून_* *ड्रेसिंगचे बँडेज* परफेक्ट कसे बांधावे हे शिकविणाऱ्या त्याच रूग्णालयातीत *_पंडत या वॉर्डबॉयपर्यंत_*...
स्वतंत्रपणे *पहिली डिलिव्हरी* करून *इपिसियॉटॉमी* करायला शिकविणाऱ्या *_गगनबावडा ग्रामीण रुग्णालयातीत स्टाफ नर्स (इनचार्ज) श्रीम.पवार व अन्य सिस्टरांपासून_* सर्पदंश झालेल्या रुग्णावर *सीटी-बीटी* टेस्ट करायला शिकविणाऱ्या माझा *_लॅब टेक्निशियन मित्र ताहेर शेखपर्यंत_*...
शासकीय सेवेत *महाराष्ट्र नागरी सेवा नियमांचा* योग्य वापर करायला शिकवणारे *_माझे पप्पा_* व त्यांच्या कार्यालयातील *कनिष्ठ कर्मचाऱ्यांपासून* ते हे नियम प्रभावीपणे अंमलात आणायला शिकवणारे माझे *गगनबावडा ग्रामीण रुग्णालयाचे* तत्कालीन *_वैद्यकीय अधीक्षक डॉ.शेट्ये सरांपर्यंत_*...
*प्रा.आ.केंद्र स्तरावर* काम करण्यासाठी मार्गदर्शन करणाऱ्या मा.जिल्हा आरोग्य अधिकारी *_संतोष गायकवाड सरांपासून_* *गोड बोलून सुरळीतपणे प्रशासन कसे चालवता येते* हे स्वतःच्या बोलण्या-वागण्यातून मा.उपमुख्य कार्यकारी अधिकारी *_देवऋषी सरांपर्यंत_*...
©Dr. Amit Tukaram Patil: कितीही टेन्शन असले तरी चेहऱ्यावरचे हास्य जराही कमी न होऊ देता सतत *खळखळून मनमोकळेपणाने हसायला* शिकविणारा माझा भाऊ *_नाशीरपासून_* ते क्षणार्धात *गंभीर व्हायला* शिकविणारा दुसरा भाऊ *_समाधानपर्यंत_*...
©Dr. Amit Tukaram Patil: माझ्या *विचारांचे अवलोकन* करून मला ते लेखनस्वरूपात मांडायला प्रवृत्त करणाऱ्या आमच्या *_उन्नती ताईंपासून_* ते माझे विचार *जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायला* मार्गदर्शन करणारे बंधू *_स्वप्नील (दादा) शिवरकरपर्यंत_*...
मला *पोहायला* शिकविणाऱ्या माझ्या *_पप्पांपासून_* ते *चारचाकी गाडी* चालवायला शिकविणाऱ्या *_दत्ता टोपलेंपर्यंत_* (मामांचे ड्रायव्हर)...
मला *सुंदर हस्ताक्षर* काढायला प्राणपणाने शिकविणाऱ्या आणि मला *वाचनाची प्रचंड आवड लावणाऱ्या* माझ्या *_पप्पांपासून_* माझा सतत पहिलाच नंबर आला पाहिजे यासाठी *सतत आणि कठोरपणे झटणाऱ्या* माझ्या *_आईपर्यंत_*...
©Dr. Amit Tukaram Patil:
आपल्यावर कुणीही आणि कितीही *आघात केले तरी* ते करणाऱ्यासह सर्वांना सतत फळा-फुलांसारखे *चांगलेच देऊन टोकाची स्थितप्रज्ञता* शिकविणाऱ्या *_वृक्षांपासून_* कितीही *कष्ट पडले आणि त्रास झाला* तरी सुबक व उबदार घरटे बांधून *सुरक्षितपणे राहायला* आणि वेळ येताच मनमुरादपणे उंचच उंच आपल्याला *हव्या त्या स्वच्छंदीपणाने* अलगद हवेत उडायला शिकविणाऱ्या *_पक्ष्यांपर्यंत_*...
©Dr. Amit Tukaram Patil:
*वेळेचे आणि काळाचे योग्य भान* ठेऊन अविरतपणे व *अविश्रांतपणे* न थकता *कष्ट* करून आपल्या *भविष्याची तजवीज* करायला शिकविणाऱ्या *_मुंगीपासून_* आपल्या *क्षमतेपेक्षा अतिजास्त कार्य* करून इतरांना मधाचा आणि केवळ मधाचाच *गोडवा द्यायला* शिकविणाऱ्या *_मधमाशीपर्यंत_*...
©Dr. Amit Tukaram Patil: आपल्याला पापी *लोकांनी कितीही घाण केले* तरी उगमापासून समुद्राशी मीलन होईपर्यंत सर्वांना आपल्या *निर्मळ व शुद्ध पाण्याने पवित्र करायला* शिकविणाऱ्या *_नदीपासून_* ते आपल्यात *सर्व काही सामावून* घेऊन स्वतःच खारट व्हायला शिकविणाऱ्या *_समुद्रापर्यंत_*...
©Dr. Amit Tukaram Patil: आपल्या *नम्र 'वाक'ण्याने* व *वागण्याने* महापुरातदेखील *टिकून राहता येते* हे शिकविणाऱ्या *_गवतापासून_* ते आपले *सरळ आणि एका रेषेत राहाणेच* आपल्या व इतरांच्या कामी येते हे शिकविणाऱ्या *_सागापर्यंत_*...
पत्नीसाठी युद्ध करूनही नंतर समाजाने *गैरसमजाने देखील* आपल्या चारित्र्यावर *बोट दाखवू नये* म्हणून *सर्व ऐहिक सुखांचा त्याग* करून *रामराज्य* स्थापन करायला शिकविणाऱ्या *_रामापासून_* ते जगातील *सर्व ऐहिक सुखांचा उपभोग* घेऊनही जनतेवर न्याय व तत्वाने राज्य करायला शिकविणाऱ्या *_कृष्णापर्यंत_*...
©Dr. Amit Tukaram Patil:
नव (विश्वाची) *निर्मिती करायला* शिकविणाऱ्या *_ब्रह्मापासून_* ते काही वेळा *न्याय्य संहार* व विध्वंस करून या विश्वाचा डोलारा अव्याहतपणे सांभाळावा लागतो हे शिकविणाऱ्या *_शिवशंकरापर्यंत_*...
Dr. Amit Tukaram Patil:
*६४ कलांची देवता असूनही* आपल्या व्यास या गुरूंकडून ज्ञानाची आणखी प्राप्ती करून घेण्यासाठी त्यांचा लेखनिक बनून *गुरुज्ञान ग्रहण करण्यासाठी आदर्श शिष्य कसे बनावे* हे शिकविणाऱ्या *_गणपतीपासून_* ते शुद्ध आणि श्वेत वस्त्ररूपी *सात्त्विक नम्रतेमुळेच विद्या शोभून दिसते* हे शिकविणाऱ्या *_माता सरस्वती देवीपर्यंत_*...
©Dr. Amit Tukaram Patil
आकाराने *लहान* असून, फारसे *सौंदर्य नसून* व *काळोखात उमलत* असूनही केवळ धुंद करणाऱ्या व दरवळणाऱ्या आपल्या ठायीच्या *सुवास* या *केवळ एकाच चांगल्या गुणामुळेही* सर्वांच्या *कौतुकास पात्र* ठरता येते हे शिकविणाऱ्या *_रातराणीपासून_* ते आपली मनमोहक रंगसंगती,सुगंध, टवटवीतपणा असे *अनेक सद्गुण* अंगी *बाळगले तर* आपले *काट्यासारखे दुर्गुणही दुर्लक्षिले जाऊन* अनेकांचे *लाडके बनता* येते हे शिकविणाऱ्या *_गुलाबापर्यंत_*...
Dr. Amit Tukaram Patil: *ज्ञान,व्यवहार,बुद्धिमत्ता,शिक्षण, शहाणपणा* असे माणसाला *जीवनावश्यक सर्व काही* शिकविणाऱ्या *_पुस्तकांपासून_* *बाहेरचे* जग *पाहिल्याशिवाय त्याला परिपूर्ण होता येत नाही* याची जाणिव करून देणाऱ्या *_प्रवास व भटकंतीपर्यंत_*...
Dr.Amit Tukaram Patil
*शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ* याचा आदर्श वस्तुपाठ घालून, *जीव लावणारे व जिवास जीव देणारे* सहकारी मिळवून *प्रतिकूल परिस्थितीतही स्वराज्य निर्मिती करता येते* हे शिकविणाऱ्या स्थितप्रज्ञ *_छत्रपती शिवाजी महाराजांपासून_* ते *सळसळत्या तारुण्याच्या चैतन्यमयी शक्तीने* तेच स्वराज्य टिकवताही येते आणि पुढे वाढविताही येते हे दाखवून आपल्या *बाणेदार वागण्याने बलाढ्य व सर्वशक्तिमान बादशहाच्या छातीतही धडकी भरवता येते* हे शिकविणाऱ्या शंभू *_छत्रपती संभाजी महाराजांपर्यंत_*...
©Dr. Amit Tukaram Patil आणि,
आपल्या *ध्येयासाठी* झपाटून घेऊन,तहानभूक,आजार,कुटुंब विसरून *कसे झोकून द्यावे* हे शिकविणाऱ्या *_माझ्या मोठ्या मामांपासून (आर.आर.आबा)_* ते आपल्या ध्येयासाठी झोकून देताना थोडासा अविचारदेखील टाळावा आणि सर सलामत तो पगडी पचास असा विचार आधी करून *स्वतःचा जीव जाण्याइतपतही झपाटलेपणा करू नये* हे शिकविणाऱ्या *_त्याच माझ्या मोठ्या मामांपर्यंत (आर.आर.आबा)_*...
आबांसारख्याच आपल्या आणखी चार *मुलांवर सुसंस्कार* करून त्यांना केवळ उच्च शिक्षणच नव्हे तर *समाजोपयोगी आदर्श जीवन जगण्याची कला शिकविणाऱ्या*, एखाद्याचे आदरातिथ्य कसे करावे याची जितीजागती मिसाल असणाऱ्या आणि *आत्यंतिक दारिद्रयातही टोकाचा संघर्ष करून यशाचे अत्युच्च शिखर काबीज करण्याचे बळ देणाऱ्या* माझ्या *_मामाच्या-आईंना (आजी)_*...
©Dr. Amit Tukaram Patil:
माझ्याशी भांडून, माझ्यावर टिका करून, माझ्याकडे बोट दाखवून, माझ्या चुका काढून *मला सतत सुधारण्याची संधी देण्यासाठी* व माझ्यात काही इष्ट बदल घडविण्यासाठी *आपल्या प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष* *_वाईट वागण्यातून शिकविणाऱ्या सर्व व्यक्तींपासून_* ते माझ्याशी सतत चांगुलपणाने वागून,मला प्रोत्साहन देऊन,माझे कौतुक करून, *_माझ्या प्रगतीची प्रार्थना देवाकडे करणाऱ्या सर्व ज्ञात व अज्ञात सद्गुणी व्यक्तींपर्यंत_*...
मी डॉक्टर होताना मला *स्वतःचे मृत शरीर देऊन* शिकविणाऱ्या *_सर्व व्यक्ती व मृतात्म्यांपासून_* ते आपले *जिवंत शरीर* कोणत्याही मोबदल्याशिवाय बिनधास्तपणे *माझ्या हाती सोपवून* *_मला चांगला डॉक्टर बनायला शिकविणाऱ्या असंख्य रुग्णांपर्यंत_*...
*_मानवजातीपासून ते निसर्गापर्यंतच्या_* *_माझ्या सर्व ज्ञात- अज्ञात गुरूंना_* वंदन करून त्यांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा देतो !
या लेखात ज्यांची नावे मी घेतली नाहीत किंवा घ्यायला विसरलोय ते लोक माझे गुरू नाहीत म्हणून नव्हे तर त्यांच्या कडून बरेच काही शिकलो असूनही केवळ शब्दसंख्येची मर्यादा मला पाळावी लागल्यामुळेच त्यांचा उल्लेख करता आला नाही. त्या सर्वांनाही आजच्या शुभदिनी मी अभिवादन करतो. *प्रत्येकाकडूनच काही ना काही चांगले शिकण्याची सवय तशीही मी लावून घेतलीच आहे!*
( *डॉ.अमित तुकाराम पाटील,*
*वैद्यकीय अधिकारी गट 'अ',*
प्रा.आ.केंद्र भाताणे,ता.वसई,
*जि.पालघर*.
*पाच्छापूर,ता.जत,जि.सांगली*)
( *_प्रस्तुत लेखक मान.आर.आर. (आबा) पाटील, माजी उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांचे सख्खे भाचे आहेत._*)
( *सर्वाधिकार सुरक्षित*)

Comments
Post a Comment