आई...My mother...
*आई*
( _डाॅ.अमित तुकाराम पाटील_ )
'प्रेमस्वरुप आई,वात्सल्यसिंधू आई' असं आईचं वर्णन सुप्रसिद्ध कवी _माधव जूलियन_ यांनी करून ठेवलंय.
त्यांनी आईला प्रेमाचा सागर म्हटलंय;पण खरंतर सागरालाही किना-याच्या मर्यादा असतात...आईच्या प्रेमसागराला मात्र अशा कोणत्याही मर्यादा नसतात. तिचे प्रेम निरपेक्ष व अमर्याद असते. मूल काळं असो वा गोरं,मुलगा असो वा मुलगी,धडधाकट असो वा व्यंग असलेलं,थोरलं असो वा धाकटं- आईच्या प्रेमात मात्र तसूभरही फरक नसतो. आणि म्हणूनच आईच्या प्रेमाची ओढ आपोआपच असते,ती कृत्रिमपणे निर्माण करावी लागत नाही. आणि,जे जे नैसर्गिक व जन्मजात (inborn),त्याला मातृत्वाशी जोडलं जातं...उदा.मातृभूमी (Motherland),मातृभाषा (mother tongue) वगैरे...
आई म्हणजे संस्कार! आई असते कुटुंबाचा कणा.
'आई पहिला गुरू,आई कल्पतरू'...कल्पतरू म्हणजे आपल्याला जे जे हवं ते ते देणारं तरू (झाड). प्रत्येकाचीच आई सर्वकाही देऊ शकेलच असं नाही;पण ती शिक्षण आणि संस्कार मात्र असं देऊ शकते की संत रामदासांच्या अपेक्षेप्रमाणे 'पुत्र व्हावा ऐसा गुंडा,ज्याचा तिन्ही लोकी झेंडा'...त्यात पुत्र अभिमन्यूसारखा असेल तर तो आईच्या पोटातच युद्धकला शिकतो आणि तो शिवबा असेल तर एक स्वतंत्र आणि स्वाभिमानी राज्य जन्माला घालतो आणि घडवितो. काही आयांची मुलं गुन्हेगार व दुष्कर्मी निपजतात जरूर पण कुठल्याही आईची आपली मुलं बिघडावीत अशी इच्छा नसते कधीच! संस्कृतात म्हटले आहेच,'कुपुत्रं भवेत् कुमाता कदापि न भवेत्।'
मुलाच्या वयानुसार आई आपल्या भूमिका बदलत जाते. एका नवीन जीवाला आपल्या पोटात वाढवणं आणि नंतर त्याच जीवाला स्वतःच्या तन-मनापासून विलग करणं ही दिसते तेवढी सोपी गोष्ट नाहीए...स्त्रीजन्माला गेल्याशिवाय तो त्याग आणि त्रास समजणं महाकर्मकठीण! एक डॉक्टर म्हणून जेव्हा एका अवघडलेल्या मातेजवळ प्रसूती करायला उभारतो,त्यावेळी तिच्या जीवाची होणारी तगमग आणि तिच्या वेदना पाहिल्या की आपली सर्व दुःखं आणि वेदना अक्षरशः कस्पटासमान वाटू लागतात. प्रसूतिवेदना ह्या सर्व वेदनांत सर्वांत जास्त तीव्रतेच्या मानल्या जातात. त्या एवढ्या तीव्र असतात की बाळाला आईच्या प्रसूतिमार्गातून बाहेर काढताना जेव्हा तो 5-6 सेंमीपेक्षा लांब व खोल फाडून नंतर तिथे टाके घातले जातात (episiotomy) तेव्हाही तिला या वेदना जाणवत नाहीत आणि हे सर्व अक्षरशः भूलीशिवायही करता येते. आणि अशा वेदना सोसणा-या आईला पाय धरून नमस्कार करण्यापलीकडे आपण काहीही करू शकत नाही.
नंतर बाळाला स्वतःचं दूध देण्यासाठीच्या तिच्या भावना शिवकालीन 'हिरकणी'च्या कथेतून आपण ऐकतच असतो.
वयसुलभ शिक्षण व संस्कार तर ती करतच असते. माझ्या आईसारख्या ब-याच आया मुलांच्या शिक्षणासाठी स्वतःच्या करिअरचा त्याग करून मुलांना घडविण्यातच स्वतःचं आयुष्य झोकून देतात,तर काही आया घर आणि कामाची कसरत करतात. बालरोगतज्ज्ञ असणारी माता इतरांच्या मुलांना जितका वेळ देते त्याच्या काही अंशही वेळ ती स्वतःच्या मुलांना देऊ शकत नाही,तर सिनेमात आईचे काम करणा-या अभिनेत्रीला स्वतःच्या मुलांना सांभाळण्यासाठी दाईला कामावर ठेवावी लागते. एकल मातांच्या ओढाताणीची आणि धावपळीची तर आपण कल्पनाही करू शकत नाही - त्यांच्या कर्तृत्वाला खरंच सलाम!
मुलगीची सर्वांत जवळची मैत्रीण खरंतर तिची आईच असते,पण ती स्वतः आई होईपर्यंत मात्र तिला ते जाणवतच नाही. आणि म्हणून *काजल सोनावणे*सारख्या सातवीतल्या एका _अनाथ_ मुलीच्या लेखणीला _सनाथ_ मुलींना अशी आठवण करून द्यावी लागते,
_सांगू किती कसं बाई_
_माझी प्रेमळ किती आई_
नंतर आपण मोठे होतो-वयाने आणि कर्तृत्वाने! इतके मोठे की,आपल्याला हवं ते भौतिक सुख आपण मिळवतो आणि सतत आपल्या केवळ आणि केवळ भल्यासाठी आपल्याला मार्गदर्शन करणा-या आईलाच आपल्यापैकी काहीजण,"ए गप्प बस जरा,तुला त्यातलं काय कळतंय?!" असं म्हणू लागतात!!! जिच्यामुळं आपण हे जग पाहू शकलो तिलाच ते असले निरर्थक आणि क्रूर प्रश्न विचारतात आणि दुर्दैवाने तेच लोक शशी कपूरच्या "मेरे पास माँ है" या संवादावर सर्वाधिक टाळ्या पिटतात! पण,सरतेशेवटी सर्व सुखांत लोळणा-या राजाला आपल्या असमाधानाचं कारण गुरुंकडून कळतं की,'स्वामी तिन्ही जगांचा,आईविना भिकारी'!
बच्चनसारख्या सर्व काही सुखं असणा-या भूमिकेसमोर त्यामानाने शशी कपूरसारख्या सौम्य भूमिकेचे प्रतिनिधित्व करणा-या अभिनेत्याचे 'मेरे पास माँ है' हे उत्तर सत्य परिस्थितीचेच वर्णन करते.
आई-वडिलांच्या चरणी माथा टेकण्याच्या सुखाएवढे दुसरे सुख नाही. आई-वडिलांसह असणारं घर म्हणजे जणू स्वर्गच! 'जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसी' असं म्हणतात ते उगीच नाही.
कविवर्य *मंगेश पाडगावकरांच्या* शब्दांत सांगायचं तर,
'इथेच काशी इथेच इश्वर,
प्रेमळ आई अथांग सागर
माता ममता उदंड देते,
नाही जिवाला घोर
_माऊली देवाहूनही थोर_।
अशा या आपल्या मातेला रोज नमस्कार करून तिचा आशीर्वाद घ्यावा आणि तिच्या सुखासाठी आपले आयुष्य अर्पण केले तरी ते थोडेच असेल.
आई,
'विनम्र माथा तुझ्याच चरणी,तू माझी आई।।
सुखा-समाधानाची वस्ती तुझीच पुण्याई।।' (आभार- *ए* *के* *शेख* )
केवळ मातृदिनीच आईची आठवण काढून तिला भेटवस्तू देण्यापेक्षा तिच्या सर्व गरजा लक्षात घेऊन तिला फुलासारखं जपण्याची आजच्या सुदिनी आपण प्रतिज्ञा करू आणि ती अंमलात आणू. तिला जेव्हा आपली गरज असते त्यावेळी तिला 'मातोश्री वृद्धाश्रमा'सारखं क्रूर नाव असणा-या ठिकाणी न ठेवता,तिची काठी बनून तिचा आधार बनण्याचा निर्धार करू'.
कारण-
सुप्रसिद्ध कवी *फ.मुं.शिंदेंच्या* कवितेत म्हटल्याप्रमाणे-
'आई एक नाव असतं...
_घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं_
सर्वांत असते तेव्हा जाणवत नाही
आता नसली कुठेच तरी नाही म्हणवत नाही
आई असतो एक धागा
_वातीला उजेड दावणारी समईतील जागा_
आई खरंच काय असते?
लेकराची माय असते-वासराची गाय असते
दुधाची साय असते-लंगड्याचा पाय असते
धरणीची ठाय असते
_आई असते जन्माची शिदोरी_
सरतही नाही...उरतही नाही...
आई एक नाव असतं
आता ती नसते तेव्हा
घरातल्या घरात गलबललेलं गाव असतं...
( *_डाॅ.अमित तुकाराम पाटील_*,
_वैद्यकीय अधिकारी गट_ ' _अ_ ',
_प्रा.आ.कें.भाताणे_,
_ता.वसई, जि.पालघर_ )

Comments
Post a Comment