अवास्तववादी ' सैराट '... Unrealistic Sairat...
*अवास्तववादी 'सैराट'*
(*_©डाॅ. अमित तुकाराम पाटील,_*
_वैद्यकीय अधिकारी गट 'अ',_
_प्रा.आ.कें.भाताणे_*)
'सैराट' पाहिल्यानंतर त्या सिनेमाने 60-70 कोटींचा व्यवसाय करण्याइतपत त्यात काहीही विशेष जाणवले नाही.
*चित्रपटाचा शेवट अगदी थेट आणि वास्तववादी दाखवलाय एवढेच काय ते वैशिष्ट्य!*
पण,जर शेवट वास्तववादी आहे असा दावा असेल आणि तेच त्या सिनेमाचे वैशिष्ट्य असेल तर मग *उर्वरित सिनेमा वास्तववादी का दाखवला नाही* असा मला प्रश्न पडला आहे.
*पालकांचे काही संस्कार असतात आणि मुलांनी ते पाळावेत एवढी पण अपेक्षा मुलांकडून पालकांनी करायची नाही का,*या प्रश्नाची कोणतीच दखल यात घेतली गेली नाही.
*मुलांनी करिअरकडे लक्ष न देता केवळ प्रेम* (की शारीरिक आकर्षण?...आठवा, परश्याची आर्चीकडून किसिंगची मागणी) *करून पोट भरते का?*
*एकीकडे समाज तरुणांकडून त्यांनी डाॅक्टर,इंजिनीअर,वकील,आय.ए.एस.,आय.पी.एस. होऊन आपले,कुटुंबाचे,गावाचे आणि देशाचे नाव उंचवावे अशी अपेक्षा करतो आणि तोच समाज 'सैराट'ला वास्तववादी म्हणून डोक्यावर घेतो,हा शुद्ध दुटप्पीपणा नाही का?*
एका बाजूला आर्चीने घर सोडले तरी ती तिच्या कुटुंबाच्या संपर्कात राहते,मात्र त्याचवेळी *परश्या मात्र आपल्यामागे आपल्या आई-वडील व कुटुंबाची काहीच चिंता करत नाही,ही गोष्ट कशी काय समर्थनीय होऊ शकते?*
हैदराबादमधल्या झोपडपट्टीत जसा *आर्ची-परश्याला आधार मिळतो,तसा प्रत्यक्ष आयुष्यात किती जणांना मिळतो?* जग कठोर आहे असं संतांनी जे म्हटलंय,ते खोटं आहे असं मग म्हणायचं का?
*सिनेमा हे मनोरंजनाचं साधन आहे हे विधान खरं की सिनेमा हा समाजाचाच खराखुरा आरसा असतो,हे विधान खरं?*
आंतरजातीय विवाह करावा की नाही हा ज्याचा-त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे; *पण,तो करताना आपलं करिअर आणि कुटुंब वाऱ्यावर सोडायचं का याचाही विचार होणं गरजेचे आहे.*
आंतरजातीय असो वा स्वजातीय; *प्रेमविवाह टिकण्याचं प्रमाण तसंही खूपच कमी आहे,* *कारण कोवळ्या वयात प्रेम आणि शारीरिक आकर्षण यांत गल्लत केली जाते.* अगदी वैद्यकशास्त्रही असेच मानते.
सिनेमा चालू असताना सार्वजनिक ठिकाणी पाळावयाच्या सभ्यतेचे भान विसरून 'झिंगाट' गाण्यावर विक्षिप्तपणे नाचणारे आणि शिट्ट्या मारणारे *प्रत्यक्ष आयुष्यात खरेच आंतरजातीय विवाहाचे समर्थन करण्याची आणि अशा विवाहांना मान्यता देण्याची शक्यता समाजातील सध्याच्या घटना व मानसिकता पाहून तशीही कमीच वाटते.*
जिथे बाॅलीवूडचे अर्थहीन सिनेमे १००-२०० कोटींचे व्यवसाय करतात तिथे 'सैराट' सारख्या सिनेमांचे ६०-७० कोटींचा व्यवसाय करणे यात विशेष आश्चर्याची गोष्ट नाही.
*समाज कोणत्या कलाकृतीला महत्त्व देतो यावरून त्या समाजाची मॅच्युरिटी (समजपातळी) ठरते हे भारतीय समाजाने लवकरात लवकर लक्षात घेणे गरजेचे आहे.*
(© डॉ.अमित तुकाराम पाटील,
वैद्यकीय अधिकारी गट 'अ',
प्रा.आ.केंद्र भाताणे)

Comments
Post a Comment