जागतिक परिचारिका दिन... World Nursing Day...
*१२ मे -* *जागतिक परिचारिका दिन*
( _डॉ.अमित तुकाराम पाटील,_
_वैद्यकीय अधिकारी गट 'अ'_)
१२ मे...जागतिक परिचारिका दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
नर्सिंगला व्यावसायिक दर्जा मिळवून देण्यासाठी अपार कष्ट घेतलेल्या फ्लाॅरेन्स नायटिंगेल यांच्या जन्मदिनी हा परिचारिका दिन साजरा केला जातो.
१२ मे १८२० रोजी उच्चकुलीन व श्रीमंत इंग्रज (ब्रिटिश) घराण्यात इटलीतील फ्लाॅरेन्स येथे त्यांचा जन्म झाला.
१८२१ साली नायटिंगेल कुटुंबीय पुन्हा इंग्लडला परतले.इ.स.१८३८ मध्ये त्यांचे वडील त्यांना युरोपच्या दौऱ्यावर घेऊन गेले.त्या तिथे असतानाच त्यांनी अभ्यास करून स्वतःच्या बौद्धिक सामर्थ्याची चाचपणी करून पाहिली व आत्मविश्वास संपादन केला.तत्पूर्वी फेब्रुवारी १७३७ मध्ये त्यांनी आपल्याला दैवी साक्षात्कार झाला असून त्यामुळे आपण आपले संपूर्ण जीवन समाजसेवेसाठी समर्पित करणार असल्याचे त्यांच्या कुटुंबियांना सांगितले.
त्यांच्या या निर्णयाला त्यांच्या आईने जोरदार विरोध केल्यामुळे १८४४ पर्यंत त्यांनी कुटुंबियांच्या निर्णयाचा आदर केला;पण अखेरीस त्यांनी समाजसेवा करण्याचा स्वतंत्र निर्णय घेतला.
तोपर्यंत त्यांनी आपले नर्सिंगचे अधिकृत शिक्षण पूर्ण केले होते. सामोरी अतिशय कठीण परिस्थिती अाल्यास सामान्य बुद्धिमत्तेच्या डरपोक व्यक्ती अडचणींची रडगाणी गातात,तर फ्लाेरेन्स नायटिंगेल सारख्या व्यक्ती त्याच परिस्थितीला संधी मानून तिचं सोनं करून दाखवतात. अशाच एका कठीण काळात म्हणजे १८५४ सालच्या क्रिमियन युद्धाच्या वेळी नायटिंगेल यांच्या कर्तृत्वाला झळाळी आली.स्वतः प्रशिक्षित केलेल्या ३८ परिचारिकांच्या मदतीने त्यांनी जखमी सैनिकांची सेवा केली व मृत्यूदर कमालीचा खाली आणला. त्या रोज रात्री रुग्णांचा 'नाईट राउंड' घेत असल्याने त्यांना 'लेडी विथ द लँप' असेही म्हटले जात असे. पुढे १८६० साली त्यांनी लंडन येथे व्यावसायिक परिचर्या शिक्षणासाठी सेंट थाॅमस हाॅस्पिटलमध्ये नर्सिंग काॅलेज सुरू केले. वैयक्तिक व परिसर स्वच्छतेबाबत प्रसार करून त्यांनी मृत्यूदर कमी करण्यात कमालीचे यश प्राप्त केले. त्यांचा सततचा हसरा चेहरा,आत्मविश्वासपूर्ण वर्तन व रुग्णांना समजणाऱ्या सुलभ भाषाशैलीमुळे त्या संपूर्ण जगभरातील रुग्णांत प्रसिद्ध झाल्या व त्यांनी नर्सिंगच्या विद्यार्थ्यांसाठी एक मापदंड प्रस्थापित केला. त्या केवळ परिचारिकाच नव्हत्या,तर संख्याशास्त्रज्ञ व अत्यंत अभ्यासू लेखिका होत्या. वैद्यकीय परिसंज्ञा सोप्या,सुलभ व सुसह्य भाषेत रुग्णांना समजावून सांगण्याचे महत्त्वाचे काम त्यांनी केले.१३ आॅगस्ट १९१० साली वयाच्या ९० व्या वर्षी पृथ्वीतलावरील एक सर्वश्रेष्ठ काम संपवून त्या पंचत्वात विलीन झाल्या.
केवळ त्यांचे स्मरण व पूजन करण्यापेक्षा त्यांनी दाखविलेल्या मार्गावरून चालणे ही त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.
_पण आज काय परिस्थिती आहे?_ _वास्तविक पाहता,डाॅक्टर खूपच कमी वेळ रुग्णांजवळ असतात._ _त्यामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांचा जास्त संबंध परिचारिकांशी येतो._ _अशा वेळी परिचारिकांनी केवळ रुग्णांची सुश्रुषाच न करता,सेवा करणेही अपेक्षित आहे._ _सरकारी सेवेत प्राथमिक आरोग्य संस्था स्तरावर तर रुग्णसेवेची खूप मोठी मदार सिस्टरांवर असते._ _मात्र रुग्णांना सेवा देण्यात काही परिचारिका टाळाटाळ करतात,तर काही जणी मोफत सेवाही आर्थिक मोबदल्याशिवाय पुरवत नाहीत._ _अशा काही थोड्याच परिचारिकांमुळे अतिशय उत्तम काम करणाऱ्या बहुसंख्य परिचारिकांचेही काम झाकोळले जाते._ _त्यामुळे आजच्या दिवशी परिचारिकांनी आपल्या व आपल्या सहकारी परिचारिकांच्या कामाचे मूल्यमापन करून चिंतन करावे आणि त्यात सुधारणा करण्याचा प्रयत्न करावा._ _सिस्टरांचा हसरा चेहरा आजाराला वैतागलेल्या रुग्णांच्या आत्मविश्वासाला प्रचंड बळ देऊन जातो,हे सत्य आहे._
_ही जशी एक बाजू आहे,त्याचप्रमाणे रुग्णांच्याकडून होणाऱ्या चुकांचीही एक बाजू आहे._ _गेल्या वर्षभरात महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात परिचारिकांच्यावर प्रत्यक्षपणे हल्ल्याच्या कमीत कमी २८ घटनांची नोंद झाली आहे ही अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे._ _शेवटी डाॅक्टर असो वा परिचारिका;तीही माणसंच आहेत,हे समाज कधी लक्षात घेणार आहे?_ _चुका सर्वांच्याकडूनच होत असतात;पण म्हणून मारहाण करणे हा त्याच्यावरचा उपाय होऊ शकत नाही,हे लक्षात घेणे गरजेचे आहे._ _परस्पर सहकार्यातूनच असे प्रश्न सुटतील याचा सर्वजण विचार करतील असा आशावाद आजच्या सुदिनी व्यक्त करतो._
*परिचारिकांनी आजपर्यंत केलेल्या रुग्णसेवेच्या कार्याला वंदन करून यापुढेही अशीच सेवा आपल्या हातून घडावी व तन-मन-धन अर्पण करून आपण रुग्णसेवेच्या महत्त्वपूर्ण कामात सक्रिय सहभाग घ्यावा यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा!*
( _डाॅ. अमित तुकाराम पाटील,_
_वैद्यकीय अधिकारी गट 'अ',_
_प्राथमिक आरोग्य केंद्र,भाताणे,_
_ता. वसई, जि. पालघर_)

Comments
Post a Comment