भारतीय 'माणसा'च्या अ'मानवी' आणि 'दुटप्पी' मानसिकतेविषयी...About the Hypocrisy in Indian Mentality...
Dr. Amit Suman Tukaram Patil:
(www.dramittukarampatil.blogspot.com)
*_भारतीय 'माणसा'ची अ'मानवी' व दुटप्पी मानसिकता !!!_*
(डॉ.अमित सुमन तुकाराम पाटील,
वैद्यकीय अधिकारी गट 'अ')
➡ आपल्याकडे खूप विनोदी पद्धती अाहेत...खरं तर तो दुटप्पीपणा आहे...त्यात कुणीच फार सुधारणा अजूनपर्यंत तरी करू शकलेले नाही; म्हणून या गोष्टींना 'विनोदी' म्हणायचे! अशा काही गोष्टींमुळेच आपल्या देशाची प्रगती होत नाही आणि माणसाचा 'माणूस' होत नाही अशी माझी धारणा आहे!
बघा तर जरा विचार करून, आपल्या समाजातील लोक (आपल्यापैकी बरेच जण, सगळे नव्हे) असं काय काय करत बसतात ते!
➡ आपल्या घरच्या जिवंत माणसांना (वयोवृद्ध आई-वडिलांसह) उपाशी ठेवतात आणि मृत व्यक्तींचे 'दिवस करून' इतरांना पंचपक्वान्ने खायला घालतात..!
➡ माणसाला जिवंतपणी प्राण्यांप्रमाणे वागवतात आणि कावळ्याला (किंवा गाईला) पूर्वज समजतात (आणि तो येऊन आपण ठेवलेल्या ताटातील पदार्थ खाऊन जाण्याची वाट बघत बसतात)..!
➡ प्राणी एकमेकांच्यावर बलात्कार करीत नाहीत हे शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध होऊनही आणि माहिती असूनही एखाद्या भगिनीवर निघृण दुष्कृत्य झाल्यावर त्याला आपण 'पाशवी' (=पशूसारखा) बलात्कार म्हणतात.
➡ घरात बायकोशी तिने केलेले जेवण हॉटेलसारखे होत नाही म्हणून वाद घालणारे लोक बाहेर गेल्यावर मात्र कोणत्या हॉटेल/मेस-मध्ये 'घरगुती' पद्धतीचे जेवण मिळेल याचा शोध घेत बसतात.
➡ आपल्या वाट्याला आलेल्या जमिनीच्या तुकड्यात उत्तम (किंवा कसलीच) शेती करायला कंटाळा करणारा माणूस सख्ख्या भावाचा शेतावरील बांधाच्या वादावरून खून करतो.
➡ देशाचे पुढारपण करणारे नेते आणि अधिकारी किती आणि कसा भ्रष्टाचार करतात याची चौकातल्या कट्ट्यावर किंवा गावातील पारावर बसून लंबीचौडी चर्चा करणारे लोक स्वतःला ट्रॅफिक पोलिसाने पकडले तरी त्याने पावती न फाडता 'चिरीमिरी' घेऊन सोडावे म्हणून त्याच्याच मागे लागतात. किंवा, स्वतःच्याच जमिनीचा ७/१२ काढताना तलाठ्याला 'चहापाणी' करतात.
➡ चित्रपटात कोणती नटी आहे आणि तिच्या अंगावर किती कमीत कमी कपडे आहेत, त्यात 'क्लोज-अपमधील लव्हसीन्स' किती आहेत याचा विचार करून तो पिक्चर पाहणारे लोक स्वतःच्या पत्नीच्या डोक्यावरून पदर जरा जरी ढळला तरी आकांडतांडव करतात!
➡ नवऱ्याला त्याच्या लग्नाआधीच्या सर्व मैत्रिणींशी लग्नानंतरही मैत्री टिकवून ठेवायची असते. पण, त्याची बायको मात्र, जुने मित्र सोडूनच द्या, एखाद्या परपुरुषाशी साधी बोलली तरी तिच्या नवऱ्याला ते चालत नसते.
➡ बरेच डॉक्टर (सर्व नव्हे) रुग्णांशी नीट बोलत नाहीत, त्यांच्याशी तुसडेपणाने वागतात. (रुग्णांच्या फीवरच यांचे दवाखाने आणि घरे चालत असतात हे माहिती असूनही ते असे वागतात). पण; स्वतः जेव्हा ते किंवा त्यांचे नातेवाईक रुग्ण होतात, तेव्हा मात्र डॉक्टरांनी पाळावयाच्या नैतिकतेवर ते लेक्चर झोडतात. (कोल्हापूर मधील अत्यंत यशस्वी मेंदूविकार शल्यचिकित्सक आणि एक अत्यंत नामांकित स्त्रीरोगतज्ज्ञ यांच्यातील जुगलबंदीचा मी स्वतः साक्षीदार आहे.)
➡ स्वतःचे पालक आपल्याला जराही समजून घेत नाहीत असं आपल्याला आपल्या तारुण्यात वाटत राहतं, कधी-कधी तर याचा आपल्याला रागही येतो. आणि, आपण जेव्हा पालक होतो...तेव्हा आपल्या मुलांनाही असंच वाटतं!!!
➡ आपल्या पत्नीच्या लांबलचक केसांचे चारचौघात विशेष कौतुक करणारे लोक तिचा तोच केस चुकून एखाद्या वेळेस जेवणाच्या ताटात निघाला की त्याच पत्नीच्या पूर्ण खानदानाचा उद्धार करतात.
('भूक' बदलली की भावना बदलते असं ज्येष्ठ व माझे लाडके कवी श्री. रामदास फुटाणे यांनी याचं सुयोग्य वर्णन केलंय!)
➡ प्रवाशाकडे एक रुपयाही कमी असेल तर एस.टी.तून खाली उतरवायलाही मागे-पुढे न पाहणारा वाहक (कंडक्टर) मात्र स्वतःकडे प्रवाशाचे ५०-१०० रुपये बाकी राहिले तरी स्वतःहून न मागता परत देत नाहीत.
➡ जगात आपला भारत हा एकमेव देश असेल जिथे 'राष्ट्रीय' नेतेसुद्धा राष्ट्रीय स्तरावर मान्यता न पावता त्यांची वेगवेगळ्या सामाजिक,राजकीय आणि प्रादेशिक गटातटांत विभागणी झाली असेल.
➡ जाती-पातींमधील भेदभाव आम्हाला मान्य नाही असे म्हणून आपण खूप प्रागतिक विचारसरणीचे आहोत असे छाती पुढे काढून सांगणारे पालक आपल्या मुलाला/मुलीला म्हणतात, "बेटा, आमचा तुझ्या लव्ह मॅरेजला जराही विरोध नाही बरं...पण, शक्यतो जोडीदार आपल्यातलाच (आपल्या जातीतला) बघ!"
➡ गल्लीत धड एक चेंडूही नीटपणे न खेळणारे किंवा शाळेच्या गॅदरिंगमध्ये मॉबमधली भूमिका पण व्यवस्थित न करणारे लोक तेंडुलकरने चुकीची बॅटिंग कशी केली किंवा हृतिकने कशी आणखीन चांगली अॅक्टिंग करायला हवी होती याचे डोस सर्वांना पाजत फिरतात.
➡ निसर्गातील स्त्रीत्वाचे शक्तिपीठ म्हणून देवीची प्रतिष्ठापना करून 'कडक' नऊ दिवस उपवास करणारे भक्त स्वतःच्या घरच्या अर्धांगिनीला मात्र दारू पिऊन झोडपून काढायला जराही कचरत नाहीत! सकाळी परत देवीच्या चरणी माथा टेकला की झाले मोकळे (बायकोला परत मारायला)!
➡ इथले लोक कधी देवाचा दगड करतील आणि परत कधी त्याच दगडाचा देव करतील याबद्दल तर खुद्द परमेश्वरही अनभिज्ञ असेल!
➡ परदेशातील वेळ पाळण्याच्या शिस्तीचे प्रचंड कौतुक असणारे भारतीय नागरिक भारतातल्या कार्यक्रमाला जाताना मात्र अभिमानाने 'इंडियन स्टँडर्ड टाइम'च्या नावाखाली प्रत्येक छोट्या-मोठ्या कार्यक्रमाला उशिरा पोहोचतात.
➡ सरकारी दवाखान्यात खूप गर्दी असतानासुद्धा पाच मिनिटंही रांगेत बसायला लागले तर दंगा करणारे 'खास' लोक खासगी दवाखान्यात मात्र स्वतः हजार रुपयांचा केसपेपर काढून दिवसभर डॉक्टरची वाट पाहत बसतात. वरून,जो डॉक्टर जास्त वेळ पाहायला लावतो, तो जास्त मोठा असा जावईशोधही लावतात!
➡ आमचे श्रद्धाळू भारतीय लोक स्वतःच्या मनाची घाण (म्हणजे पापं) धुवायला पवित्र नद्यांत डुबक्या लावतात आणि परत त्याच नदीतील घाण काढून ती स्वच्छ करायला कोट्यवधींचा निधी मंजूर करून घेतात! हे बघून म्हणावंसं वाटतं की, अरे बाबांनो, आधी मनं स्वच्छ करा ना!!
➡ हल्ली लोक खूप शिकून उच्च व सुशिक्षित होतात; पण सुसंस्कृत व्हायचं सोयीस्कररीत्या विसरून जातात.
➡ भारतीय लोक गाडीचं सर्व्हिसिंग अगदी वेळेत करून घेतात; पण डॉक्टरांनी वर्षातून एकदा सगळ्या तपासण्या (टेस्ट्स्) करून घ्या असं सांगितलं की, 'त्याचं काय जातंय टेस्ट करून घ्या म्हणायला? पैसे काय झाडाला लागतात काय?' असं बोलतात.
➡ डॉक्टरांनी एखादी तपासणी करायला सांगितली आणि जर का तिचा रिपोर्ट नॉर्मल आला की बऱ्याच रुग्णांना खूप दुःख होतं. म्हणजे, आता एवढे पैसे घालवून तपासणी केली तर त्यात थोडा का होईना दोष यावा असं यांना वाटत असावं ! म्हणजे पैसे फिटल्याचं तरी समाधान !!!
➡ डॉक्टरांनी ऑपरेशन करायला सांगितलेल्या दिवसापासून त्याचं टेन्शन घेणारे लोक एकदा का ऑपरेशन पार पडलं की येणा-जाणाऱ्याला त्या ऑपरेशनचे टाके त्यांची इच्छा नसताना दाखवत बसतात!
लांब कशाला? एखादं लहान मूलसुद्धा खेळताना वगैरे पडलं तर एकटं असताना जराही रडणार नाही; पण आसपास कोणी असेल तर मात्र जोरजोरात भोकांड पसरणार!
➡ भारतात राहणारे लोक भारत सोडून जगभरातल्या इतर देशांचं बरंच कौतुक करत राहतात आणि स्वतःच्याच देशाला नावं ठेवत बसतात! हे दुर्दैव!
➡ आणि, माणूस स्वतः चुकला की चांगला वकील आणि दुसरा चुकला की लगेच न्यायप्रिय न्यायाधीश बनतो ही खरी मानवतेची शोकांतिका आहे !!!
(©डॉ. अमित सुमन तुकाराम पाटील,
वैद्यकीय अधिकारी गट 'अ',
प्रा.आ.कें. भाताणे, ता. वसई,
जि.पालघर)
(© सर्व हक्क लेखकाकडे सुरक्षित)
(प्रस्तुत लेखक हे मान. श्री. आर. आर. (आबा) पाटील, माजी उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांचे सख्खे भाचेे आहेत.)

Khup chan amit dada.. Khup sadhya goshti ahet ya. Majyapasun surwat kartoy swatamadhe change karaychi. Jewadhe lok he vachun change hotil tevdha tumcha lekhni sarthki lagala mhanun samja.kharatar ya sarv goshti aka writer ne sangav lagta hech khar dukhh ahe. Nakkich aaplya sanskarat kuthetari kami ahe.Ani asach swatala thoda vichar karayla lavnare lekh lihit raha.best luck.
ReplyDeleteKhup chan amit dada.. Khup sadhya goshti ahet ya. Majyapasun surwat kartoy swatamadhe change karaychi. Jewadhe lok he vachun change hotil tevdha tumcha lekhni sarthki lagala mhanun samja.kharatar ya sarv goshti aka writer ne sangav lagta hech khar dukhh ahe. Nakkich aaplya sanskarat kuthetari kami ahe.Ani asach swatala thoda vichar karayla lavnare lekh lihit raha.best luck.
ReplyDeleteUshira Aso kinva lavkar...Apan badlayala have yachi janiv zali tari pushkal zale.
DeleteAni ho,mi lihito;pan mi lekhak nahi.
Tumcha support ahe mhanun lihito itkech.
Thanks Kiran
ReplyDeleteदादा उत्तम संस्कार,विचार,वाचन याचा उत्कृष्ठ संगम तुमच्या लेखनातून अनूभवायला मिळाला.सगळ्यानी यातून काही ना काही शिकण्यासारखे आहे.पूढच्या लिखाणासाठी मनःपूर्वक शूभेच्छा
ReplyDeleteThanks Yash
Deleteमला तर असे वाटत कि आपला दृष्टिकोन बदलायला हवा. बोलण्यात आणि वागण्यात संयम आणि तारतम्य राखणाऱ्या तुझ्यासारख्या एका योग्य व्यक्तीकडून हा लेख लिहिला गेला आणि कमी वयात आलेली तुझ्यातील परिपक्वता आणि योग्यता दिसून आली.अमित खूप छान लेखं..
ReplyDeleteThanks Amit

ReplyDeleteActually it's not related to maturity but good observation.
Delete