अखेरीस ज्याची भीती वाटत होती तेच होतंय की काय?! दलित प्रतिमोर्च्यांबाबत...(Are Dalit anti-Maratha morchas becoming the reality? About Dalit Mahamorchas...)
🔘अखेरीस ज्याची भीती वाटत होती तेच होतंय की काय ?!🔘
(©२०१६,डॉ.अमित सुमन तुकाराम पाटील)
▶▶▶ 'एक मराठा, लाख मराठा' ही टॅगलाइन घेऊन निघालेल्या मराठा मूक महामोर्च्यांना प्रत्युत्तर देण्याच्या स्वरुपातले 'दलित-एन.टी.-व्ही.जे.-ओ.बी.सी.' यांचे 'नवे पर्व, बहुजन सर्व' अशी टॅगलाइन घेऊन महामोर्चे निघायला सुरुवात झाली आहे. बीड, नांदेडमध्ये ते झालेही आहेत.
▶ पहिला मुद्दा- प्रतिमोर्चे कशासाठी?-
कोणी कितीही दावा केला की हे मोर्चे मराठा क्रांती मोर्च्यांच्या विरोधात नाहीत, तरी त्यावर विश्वास कसा ठेवावा?
कारण, या दलित-ओ.बी.सी. मोर्च्यांचे 'टायमिंग' बघता, मराठ्यांनी मोर्चे काढण्याच्या आधी दलितांना या प्रश्नांची कधीच जाणिव झाली नव्हती का असा साधा सोपा प्रश्न मनात येतो.
काल टी.व्ही.वर बोलताना एका आंबेडकरी लेकीने सांगितले की, अॅट्रॉसिटी कायदा आणखी कडक केला पाहिजे, कारण त्या कायद्यांतर्गत गुन्हा सिद्ध होऊन त्यात संबंधितांना शिक्षा होण्याचे प्रमाण केवळ ४ टक्के इतके अल्प आहे. मुद्दा वस्तुनिष्ठ आकडेवारीवर बरोबर आहे हे मान्य; पण हे या मोर्चेकऱ्यांना आजच लक्षात का यावे? मराठा मोर्च्यांच्या आधी दलित समाजधुरिणांना याची कल्पना नव्हती का? असेल तर मग त्यांनी मराठा क्रांती मोर्च्यांच्या आधी त्याबद्दल का मोर्चे काढले नाहीत? आणि, याआधी कल्पना नसेल तर मग मराठा मोर्च्यांनीच या गोष्टीची जाणिव त्यांना करून दिली हे त्यांनी मान्य करावे. हे मान्य केले की त्यांचे मोर्चे मराठा क्रांती मोर्च्यांना प्रत्युत्तर म्हणून काढले गेले आहेत हेही आपोआपच सिद्ध होईल.
उत्तरे काही असली तरी त्यांचे मोर्चे मराठा समाजाच्या मागण्यांना अप्रत्यक्ष विरोध करणारे प्रतिमोर्चेच आहेत असे मानायला जागा आहे.
इतके दिवस आम्ही मराठा शांतपणे मागण्या मांडतोय. काही कायद्यांबाबत आम्हाला आक्षेप असतील तर सरकार तज्ज्ञांची समिती नेमून त्यात काय बदल करायचे किंवा बदल करायचे की नाही याबाबत विचार करेल. अशा समितीत मान. सामाजिक न्यायमंत्र्यांचा समावेश असेलच. ते तेथे त्यांची बाजू प्रभावीपणे मांडू शकतील व त्यातून मध्यम मार्ग काढता येईल.
सगळ्यांनीच (मराठा व दलित दोहोंनी) जर रस्त्यावर यायचे म्हटले अशा मोर्च्यांमुळे जनजीवन विस्कळीत होत नाही का? पोलिस यंत्रणा आणि प्रशासनावर ताण येत नाही का? आपल्याच कच्च्या-बच्च्यांचे हाल होत नाहीत का? आमच्याच माता-भगिनींचे हाल होत नाहीत का? शहरेच्या शहरे ठप्प होत नाहीत का? आर्थिक व्यवहार बंद पडत नाहीत का?
तुम्ही (मराठा) रस्त्यावर उतरला, मग आम्ही (दलित,ओ.बी.सी.) का मागे राहू ही भूमिका योग्य नाही.
▶ दुसरा मुद्दा- चर्चा हाच मार्ग-
बहुसंख्येने असणारा मराठा समाज रस्त्यावर उतरलाय म्हणून सरकारने लगेच आमच्या सगळ्या मागण्या मान्य करू असे कुठे सांगितलंय?
सरकार अभ्यास आणि चर्चा करून (दलित,ओ.बी.सी.नेत्यांशीही) मार्ग काढू असं सांगतंय हे सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे. तुम्ही चर्चेला तयार व्हा आणि तुमचे आक्षेप जरूर नोंदवा; त्याला मराठा समाज विरोध करणार नाही.
▶ तिसरा मुद्दा-ओ.बी.सीं.नी का विरोध करावा?
मराठ्यांचा समावेश ओ.बी.सी.मध्ये करावा की नाही हे सरकार व न्यायालये पूर्ण अभ्यासांती ठरवतील. त्याला उगीच ओ.बी.सी. समाजाने विरोध करू नये. ओ.बी.सी.मधीलही काही लोक आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत. त्यामुळे काही ठराविक मराठे श्रीमंत आहेत म्हणून सकल मराठा समाज पुढारलेलाच आहे हे चुकीचे आहे.
समतेचे जागतिक प्रतीक असणाऱ्या छत्रपती शाहू महाराजांनीही मराठा समाज मागास असल्याने त्यांना आरक्षण दिले होते. १९५६ च्या काका कालेलकर समितीनेही मराठ्यांंना मागास प्रवर्गात आरक्षण देण्याची भूमिका घेतली होती.
आमचे मराठा समाजातील काही लोक जे म्हणतात की, आत्ताच्या ओ.बी.सी.ला धक्का न लावता मराठ्यांंना ओ.बी.सी.त आरक्षण मिळाले पाहिजे त्याला माझ्यासारख्या मराठा तरुणांचा विरोध आहे.
एकदा तुम्ही ओ.बी.सी. झाला की आधीचे मूळ ओ.बी.सी. वेगळे आणि नवीन झालेले ओ.बी.सी. वेगळे हे घटनेतील कलमांमध्ये बसणे शक्य नाही, हे लक्षात घ्यावे.
मराठ्यांना सरसकट ओ.बी.सी.चा दर्जा देऊन आर्थिक उत्पन्नाची मर्यादा १० लाखांपर्यंत वाढवावी असे माझ्यासारख्या स्वकष्टातून व बुद्धिमत्तेवर (आरक्षणाशिवाय) शिकून आज उच्चशिक्षित झालेल्या तरुणांना वाटते. किंवा सरळ एस.सी.,एस.टी.प्रमाणे क्रिमीलेयर वगैरे अटी न घालता आरक्षण द्यावे.
हे आर्थिकदृष्ट्या शक्य नसेल तर सरसकट सर्वांना शिक्षणासाठी दीर्घ मुदतीचे बिनव्याजी कर्ज द्यावे, म्हणजे कोणच्याही मनात अन्यायाची भावना उरणार नाही.
माझ्याही समाजातले ८०% लोक आर्थिकदृष्ट्या खूप मागे आहेत हे सत्य आहे व सर्वांनी त्याचा वस्तुनिष्ठपणे स्वीकार करावा. याचे भावनिक राजकारणी करू नये.
▶ चौथा मुद्दा- आम्हीही बहुजनच-
'नवे पर्व-बहुजन सर्व' अशी दलित समाज मोर्च्यांची टॅगलाइन आहे. याचा अर्थ आम्ही मराठा समाज बहुजनांत नाही असे या दलित समाजधुरिणांचे म्हणणे आहे का? असे असेल तर ब्राह्मण-ब्राह्मणेतर वादानंतर आता मराठे-मराठेतर चळवळ काही जणांनी सुरू करण्याचा प्रयत्न चालविला आहे असे आम्हा मराठ्यांनी समजायचे का?
मागण्या करणे लोकशाहीत योग्यच आहे; पण याचा अर्थ बहुसंख्येने असणाऱ्या मराठा समाजासारख्या समाजाने स्वतःच्या काही मागण्या करायच्या नाहीतच असा नाही. मराठा समाज बहुसंख्येने आहे म्हणून तेे म्हणतील तोच कायदा असे काही चित्र व वास्तव नाही. त्यामुळे केवळ आम्ही मागण्या करतोय म्हणून इतरांनी त्याला विरोध करावा ही मनोवस्था व भूमिका जराही पटण्यासारखी नाही.
▶ पाचवा मुद्दा- मोठा भाऊ-
मराठा समाज सर्वांना नेहमी बरोबर घेऊन चालतो याला इतिहास व वर्तमान साक्षी आहे. मोठ्या भावाने (मराठा) समजुतीने वागावे याचा अर्थ लहान भावाने (मराठेतर) त्याला कसेही घालूूनपाडून वागवावे असे होत नाही. आम्ही मोठ्या भावाची भूमिका व्यवस्थित पार पाडतो आहोत आणि यापुढेही पाडू.
उत्तर भारतातील बहुसंख्य उच्चवर्णीय समाजाने तेथील मागास समाजावर जसे अत्याचार केले आहेत तसे मराठ्यांनी येथील पददलितांवर कधीच केले नाहीत याला इतिहास साक्षी आहे.
▶▶▶ शेवटी सर्वांत महत्त्वाचे- आमचा वैचारिक वारसा-
मराठा समाजाचेच असणाऱ्या कूळवाडीभूषण छत्रपती शिवाजी महाराज, त्यांचे पुत्र (धर्मवीर नव्हे, स्वातंत्र्यवीर) छत्रपती संभाजी महाराज व समतेचा महामेरू छत्रपती शाहू महाराज यांनी स्वराज्य केवळ मराठ्यांचे आहे असे कधीच ना स्वतःच्या वाणीने म्हटले ना तशी कधी कृती केली. आम्ही आजचे मराठे त्यांचीच लेकरे आहोत आणि त्यांचाच वारसा पुढे घेऊन जातोय आणि यापुढेही जात राहू अशी सर्व मराठ्यांचा प्रतिनिधी म्हणून मी ग्वाही देतो. आम्ही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनाही आदर्शच मानतो. त्यांच्या बुद्धिमत्तेबद्दल व समाजोद्धाराच्या कामाबद्दल केवळ दलितांनाच नव्हे मराठ्यांसकट संपूर्ण देशाला कमालीचा आदर आहे. त्यांच्या विचारांचेही आम्ही मराठे पाईक आहोत. सयाजीराव गायकवाड (मराठा), छत्रपती शाहू महाराज (मराठा) आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी एकमेकांच्या कार्याची जाहिर स्तुती केली होती हे आम्ही मराठे कधीच विसरलो नाही व विसरणारही नाही.
▶ तुम्ही तुमच्या मागण्या सरकारपुढे जरूर मांडा; पण त्या आम्हा मराठ्यांना विरोध म्हणून नकोत.
▶▶▶ आम्ही मराठे तुम्हाला आमचेच बांधव मानतो, तुम्हीही माना.
एकमेकांना विरोध करण्यापेक्षा आपण एकत्र येऊन मोठा बदल घडवून आणू शकतो!
(©२०१६, डॉ.अमित सुमन तुकाराम पाटील)
(©सर्व हक्क लेखकाकडे सुरक्षित)
(प्रस्तुत लेखक हे मान.श्री.आर.आर.(आबा) पाटील, माजी उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांचे सख्खे भाचेे आहेत.)
(लेखकाने व्यक्त केलेली मते वैयक्तिक स्वरुपाची आहेत.)

पाटील साहेब खरच ग्रेट आहात
ReplyDeleteधन्यवाद!
Delete