माणसा माणसा कधी होशील माणूस?! (अस्वस्थ, अस्वस्थ, अस्वस्थ !!!)
माणसा माणसा कधी होशील माणूस!
(अस्वस्थ, अस्वस्थ, अस्वस्थ !!!)
(©डॉ.अमित सुमन तुकाराम पाटील,
वैद्यकीय अधिकारी गट 'अ')
(©सर्व हक्क प्रस्तुत लेखकाकडे सुरक्षित)
(प्रस्तुत लेखक हे मान. श्री. आर. आर. (आबा) पाटील, माजी उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांचे सख्खे भाचे आहेत.)
(केवळ वॉट्स अॅप संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक- ७८८७५६९६९९)
जगभरात करियर करण्याची अगणित क्षेत्रे असली आणि रोजच त्यात नव-नवीन क्षेत्रांची भर पडत असली तरी वैद्यकीय शाखा हे असे एकमेव क्षेत्र आहे जिथे दोन्हीही बाजूची माणसे (म्हणजे डॉक्टर आणि पेशंट्स व त्याचे नातेवाईक) एकमेकांशी शक्यतो खोटे बोलत नाहीत.
त्याच वैद्यकीय क्षेत्राचा एक भाग बनू शकल्याचा एकीकडे आनंद वाटतो; रुग्णाचा जीव वाचवल्यानंतर आणि त्याच्या वेदना कमी झाल्यावर डॉक्टरांना होणाऱ्या समाधानाची तुलना तर होऊच शकत नाही. परंतु, दुसरीकडे मात्र माणसाच्या काही ज्ञात-अज्ञात पैलूंशी प्रत्यक्ष संबंध येत असल्याने काही विदारक अनुभवही वाट्याला येत असतात.
सगळं काही 'गुडी-गुडी' लिहायच्या, वाचायच्या आणि बोलायच्या या जमान्यात मी माझ्या वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत झाल्यावर अल्पकाळातच आलेल्या काही अनुभवांबद्दल लिहितोय... सगळ्यांना बरं वाटावं म्हणून काही लिहिण्यापेक्षा सगळ्यांना विचार करावयास भाग पाडेल असं काहीतरी लिहिण्याचा माझा हा प्रयत्न अाहे!
प्रसंग पहिला-
एम.बी.बी.एस.ची अंतिम परीक्षा मी अतिशय उत्तम गुणांनी व राज्यात दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झालो.
आता वरिष्ठ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली एक वर्षाची आंतरवासिता पूर्ण करावी लागणार होती.
माझी आंतरवासिता चालू झाली होती, तेव्हाचा हा प्रसंग.
मेडिसीन या मुख्य विभागांतर्गत येणाऱ्या अतिदक्षता विभागात माझी 'नाईट ड्यूटी' चालू होती.
रात्री ११ वाजता सीनियर रेसिडेंट आणि लेक्चरर यांनी राउंड घेतला. मी तो 'अटेन्ड' केला.
एकूण १० रुग्ण मृत्यूशी निकराची झुंज देत होते.
त्यांच्या या लढाईला आम्ही डॉक्टर मंडळी बळ पुरवत होतो.
'अतिदक्षता विभागा'च्या लॉबीमध्येच यमराज त्यांच्या कुप्रसिद्ध रेड्यासह ठाण मांडून असतात अशी माझी धारणा आहे!
यम आणि रुग्णामध्ये डॉक्टर हा एकच सजीव अडथळा असतो.
असो.
प्रत्येक रुग्णाच्या नोट्स टाकण्यासंदर्भातील सूचना देऊन झाल्यावर जाताना दाराजवळ असलेल्या एका आजींजवळ उभे राहून सर मला म्हणाले, "अमित, या पाटील आजींकडे जरा जास्त लक्ष दे. त्या खूप जास्त गंभीर (serious) आहेत. सध्या 'स्टेबल' आहेत. पण, त्यांना कधीही दम्याचा (asthma) किंवा सीओपीडीचा (एक तीव्र श्वसनावरोधाचा आजार) अटॅक येऊ शकतो. त्यांच्या श्वासाची गती (Respiratory Rate) आणि ऑक्सिजन संपृक्तता (oxygen saturation) दर अर्ध्या तासांनी मोज. काही अडचण अाली तर पटकन सीनियर रेसिडेंटला किंवा मला फोन कर. स्थिती खूपच गंभीर असेल तर इनहेलर किंवा स्टेरॉइड इंजेक्शन्स आणि डेरिफायलिन इंजेक्शन लगेच दे आणि आम्हाला फोन कर."
मी "हो, सर" म्हणालो.
खरं तर मला खूपच टेन्शन आले होते.
पण, अवघड प्रसंगातूनच शिकण्याची जास्त संधी मिळते!
रुग्ण जेव्हा अॅडमिट असतात त्यावेळी त्याचा एखादा तरी नातेवाईक दवाखान्यात त्याच्याबरोबर असावा असे डॉक्टर सांगतात. रात्री-अपरात्री केव्हा कधी कशाची गरज पडेल हे सांगता येत नाही.
आय. सी. यू. मधील रुग्णांच्या नातेवाईकांना तर तेथेच बाहेर लॉबीमध्ये थांबायला जागा दिलेली असते.
तर आपण 'त्या' रात्रीबद्दल बोलत होतो.
मी मॉनिटरिंग करत होतो.
काउंटरवर बसले की त्याच काउंटरवर डोके ठेऊन झोप लागते, म्हणून मी आय. सी. यू. च्या बरोबर मध्यभागी खुर्ची ठेऊन त्यावर बसायचो.
त्यामुळे एकतर आय. सी. यू. मधील सगळे रुग्ण खुर्चीवर बसूनच नजरेच्या टप्प्यात येत असत आणि दुसरे म्हणजे झोप पण येत नसे.
रात्री ०१.३० च्या आसपास त्या आजींजवळचा मॉनिटर वॉर्निंग सिग्नल द्यायला लागला.
त्यांच्या श्वासाची गती खूपच वाढली होती आणि ऑक्सिजन संपृक्तता ९०% च्या खूप खाली आली होती.
शेवटी जे वाईट घडणार होते तेच घडले.
ही सर्व अटॅकचीच चिन्हे होती.
माझ्यापुढे आता दोनच पर्याय होते; रेसिडेंटला फोन करणे किंवा इंजेक्शन आणि नेब्युलायझेशन देणे.
मी इंजेक्शन द्यायचा निर्णय घेतला आणि ब्रदरला रेसिडेंट डॉक्टरांना फोन करून बोलवायला सांगितले.
इंजेक्शन दिल्यावर आजींचा अटॅक एक-दोन मिनिटांत थांबायला हवा होता.
पण, तसे झाले नाही.
तेवढ्यात रेसिडेंट डॉक्टर आले.
त्यांनी पुढचे उपचार सुरू केले आणि मला रुग्णाच्या नातेवाईकांना या गोष्टीची त्वरीत कल्पना देऊन त्यांची 'सीरियसनेस कन्सेंट'वर (रुग्ण अत्यवस्थ असल्याबाबतची माहिती) सही घ्यायला सांगितले.
मी बाहेर गेलो.
वॉर्डबॉयला रुग्णाच्या नातेवाईकांना बोलवायला सांगितले.
तो आठ-दहा वेळा हाका मारून नकारार्थी मान डोलवत परत आला.
मग आम्ही त्या आजींच्या दोन्ही मुलांच्या मोबाईल नंबरवर फोन करायला सुरुवात केली.
रात्री अंदाजे १.३० वाजल्यापासून ते पहाटे ४.३०-५.०० वाजेपर्यंत आम्ही सुमारे ४०-५० कॉल तरी केले.
एकाही फोनला उत्तर मिळाले नाही.
इकडे आजींच्या प्रकृतीत काही अपेक्षित सुधारणा होत नव्हती.
शेवटी, सकाळी ०६.३० वाजता आजीचे दोन्ही 'सुपुत्र' हजर झाले.
माझ्या रागाचा पारा चढला होता.
ते दोघे आल्यावर त्यांच्याशी काय आणि कुठल्या पातळीवर बोलायचे हे मी मनातल्या मनात आधीच ठरवून टाकले होते.
अखेरीस आमचे बोलणे सुरू झालेे.
मी म्हणालो, "काय किती फोन करायचे? आम्ही पेशंटवर उपचार करायचे की तुम्हाला फोन करण्यात वेळ घालवायचा?"
त्यातला एक जण मला म्हणाला, "काय झालं डॉक्टर? गेली ना ती? किती वाजता गेली?"
मी शॉकमध्ये.
मलाच धक्क्यावर धक्के.
ज्यांना धक्का बसायला पाहिजे होता, ते मात्र मख्ख आणि निर्विकार!
मी म्हणालो, 'अहो, काय बोलताय हे? त्या आई आहेत ना तुमच्या?"
त्यांच्यातला दुसरा, "आम्हाला वाटलं गेली असेल आत्तापर्यंत! किती चिवट म्हातारी आहे ही! जाता जात नाही! मी म्हणतो, अजून किती जगायचंय हिला! अर्ध्या गोऱ्या गेल्या मसणात; पण ही काही जायला तयार नाही!"
मी म्हटलं, 'ऐका. त्यांची प्रकृती गंभीर आहे. एक महत्त्वाचे औषध बाहेरून आणावे लागेल. मग, थोड्या बऱ्या होतील त्या.'
पहिला, "जाऊ द्या, डॉक्टर. तुमच्याकडंच्या औषधावर जेवढं होईल तेवढं करा. आणि, व्हय. आता ती मेल्यावरच फोन करा."
सकाळी ८.०० वाजता शेवटी त्या पाटील आजी गेल्या.
आता त्या दोघांनीही अगदी पहिल्या रिंगलाच फोन उचलला.
१५ मिनिटांत दोघेही हजर!
त्यांच्या जन्माच्या वेळी या आजीने (त्यांच्या आईने) पेढे वाटले असतील ना..!
आता, तीच आजी निस्तेज...तिचे मुलगे निर्विकार...आणि, मी निःशब्द व सुन्न!!!
यम अगदी योग्य वेळी आला म्हणायचंं.
आज आयुष्यात पहिल्यांदाच त्या क्रूर यमाबद्दल मला कमालीचा आदर वाटत होता की काय..!
प्रसंग दुसरा-
आता माझी शल्यचिकित्सा विभागातील अतिदक्षता कक्षात ड्यूटी...
मेडिसीन विभागातील उपरोल्लेखित व अन्य अनुभव गाठीशी होतेच.
शल्यचिकित्सा तसा माझ्या आवडीचा विषय, त्यामुळे उत्साही होतोच. त्यात, माझ्या एका मित्राचे पोस्टिंगही माझ्याबरोबर लागलेले. मग काय, दुधात साखरच!
पहिल्याच दिवशी क्युबिकल क्रमांक ४ ला एक २१ वर्षांची मुलगी अॅडमिट असल्याचे राउंड घेताना कळाले होते. तिचे आडनाव कांबळे होते व ती कोल्हापूरजवळच्या एका गावची होती. दोन वर्षांपूर्वी जेव्हा तिचे लग्न झाले होते त्यावेळी तिची तब्येत बरी असायची; फक्त अधूनमधून कधीतरी अंगावर सूज यायची, जे गावाकडच्या डॉक्टरला खूप गंभीर वाटत नव्हते.
आत्ता अतिदक्षता विभागात भरती असताना ती मुलगी जरा जाड वाटत होती. पण ती जास्त वजनामुळे नव्हे तर अंगावर सूज असल्यामुळे तशी दिसत होती हे तिची फाइल बघितल्यावर लक्षात आले.
तिला Autosomal Dominant Polycystic Kidney Disease (ऑटोसोमल डॉमिनन्ट पॉलिसिस्टीक किडनी डिसीज) हा आजार झाला होता. या आजारामध्ये किडनी व अन्य काही अवयवांमध्ये सिस्ट्स (द्रवाने भरलेल्या पोकळ गाठी) तयार होतात आणि किडनीचे काम हळूहळू निकामी करतात. ही अवस्था पहिल्यांदा काही औषधे व प्रथिनांचे सप्लिमेंट्स देऊन आटोक्यात ठेवता येते. पण, नंतर नंतर आजार गंभीर रूप धारण करू लागतो आणि End Stage Renal Disease (ESRD) (अंतिम पातळीवरचा मूत्रपिंडाचा आजार) कडे वाटचाल चालू होते. एकदा का ही स्टेज आली की मग किडनी प्रत्यारोपण केले नाही तर काही वर्षांत मृत्यू येणे अटळ असते.
पहिले काही दिवस माझी ड्यूटी दुपारी २ ते रात्री ८ वाजेपर्यंत, नंतरचे काही दिवस रात्री ८ ते सकाळी ८ वाजेपर्यंत व शेवटचे काही दिवस सकाळी ८ ते दुपारी २ वाजेपर्यंत अशी होती.
पहिल्या दिवशी आम्ही दुपारी २.३० चा राउंड घेताना आम्हाला अशी माहिती कळाली की, तिचे रिपोर्ट्स मिरजेला मूत्रविकारतज्ज्ञ डॉ. गांधी सरांकडे पुढील उपचारांबाबतच्या मार्गदर्शनासाठी पाठविले आहेत.
तिच्याबरोबर तिचा नवरा (तोही २३-२४ वयाचा) काळजीवाहक (caretaker) म्हणून राहिला होता. तिचे आई-वडील, सासू-सासरेे, सख्खे-चुलत भाऊ-बहिणी, लांबचे, जवळचे अशी सगळी तिची स्वतःची आपली माणसं तिला रोज भेटायला येत असत, तिला आधार देत असत, तिची काळजी घेत असत. दवाखान्यातील वाईट दिवसांत तेवढेच काय ते सुखाचे क्षण त्या मुलीला अनुभवायला मिळायचे, आणि मलाही ते पाहून बरे वाटायचे.
वाईट प्रसंगातही आपली माणसं आपल्या जवळ असणे हाच काय तो मनाला मोठा आधार असतो आणि मनाला दिलासा देणारीही ती एक गोष्ट असते.
पुढील ५-६ दिवसांनी डॉ. गांधींनी त्यांचा तज्ज्ञ अहवाल पाठविला की, 'रुग्णाला मूत्रपिंड प्रत्यारोपणाची अावश्यकता आहे'.
त्यानंतर मात्र तिच्या नातेवाईकांची सर्व गर्दी आटून गेली. लांबचे नातेवाईक सोडून द्या, पण, तिच्या आई-वडील, सासू-सासरे आणि सख्ख्या भावंडांनीही दवाखान्यात फिरकायचे बंद केले. नवरा मात्र एक मिनिटही तिथून हलायचा नाही.
तो एक रोजंदारीवर काम करणारा कामगार होता. महिना कशीबशी ५-६ हजार कमाई. कसातरी संसाराचा गाडा तो ओढायचा. त्यात मध्येच त्याच्या बायकोचे दुखणे उपटले. आजपर्यंत तिच्या उपचारांवर झालेला खर्च त्याने आजवर साठवलेल्या पुंजीपेक्षा खूप जास्त झाला होता. आत्ताच तो कर्जात होता. तरीही, बायकोवरील प्रेमापोटी तो कितीही खर्च आला तरी तिच्यावर उपचार करायला तयार होता.
पण, इथे प्रश्न पैशांचा नव्हता, किडनीचा होता. मॅच होणारी किडनीच प्रत्यारोपित करावी लागणार होती.
शक्यतो रक्ताच्या नानातेवाईकांनी अशी किडनी दिली तर ती मॅच होण्याची शक्यता जास्त असते. हीच गोष्ट तिच्या सगळ्या 'रक्ताच्या नात्यांना' तिच्यापासून दूर लोटणारी ठरली. एकही नातेवाईक फिरकेनासा झाला होता.
नवरा मात्र किडनी द्यायला तयार होता. एक काय, दोन्ही किडन्या काढून तिला बसवा; पण डॉक्टर, काहीही करून तिला वाचवा असे तो सतत म्हणत होता.
मलाही आश्चर्य वाटायचे.
ज्यांनी जन्म दिला ते दूर झाले, एकाच पोटी जन्म घेतलेले भाऊ-बहीण दूर झाले, लग्नानंतर तिच्या आई-वडिलांना 'आता तुम्ही हिची काळजी करू नका. ती आजपासून आमची मुलगी झाली आणि आम्ही तिचे आई-वडील!' असे म्हणून पालकत्व पत्करलेले सासू-सासरे तर कुठच्या कुठे पळाले.
रक्ताची नाती अशी दूर झाली असतानाच केवळ दोनच वर्षांपूर्वी तिचा जीवनसाथी बनलेला तिचा नवरा मात्र तिच्यासाठी 'काहीही करायला' तयार होता. Blood is thicker than water ही म्हण खोटी ठरावी अशीच ही स्थिती!
आमचा तो अाय. सी. यू. ड्यूटीचा शेवटचा दिवस होता.
सकाळची शिफ्ट होती.
मी आणि माझा मित्र अतुल चहा पिऊन आय. सी. यू. कडे जात होतो.
पहिले दार उघडून दुसऱ्या दाराकडे जात असतानाच 'तिचा' नवरा आतून बाहेर येताना दिसला.
आत्तापर्यंत १०-१२ दिवसांत तो चांगल्या ओळखीचा झाला होता.
नेहमी आम्हाला बघून स्मितहास्य करणारा 'तो' आज कसनुसा हसला. त्याच्या चेहऱ्यावरचा तणाव पटकन जाणवला. मनात शंकेची पाल चुकचुकली.
तसेच आत गेलो. पाहतो तर 'ती' डोळे मिटून शांतपणे झोपली होती. जणू-काही तिला कुणाचाच राग आला नव्हता, ती समाधानी होती.
होय, खरेच तिने समाधानाने डोळे मिटले होते...'ती' शांतपणे अनंताच्या प्रवासाला निघाली होती!
बऱ्याचदा फोन करूनही 'तिच्या' किंवा 'त्याच्या' रक्ताच्या कोणत्याच नातेवाईकाने फोन उचलला नव्हता.
आपल्या पोटच्या गोळ्याचे, एकाच रक्ताचे असणाऱ्या आपल्या बहिणीचे, आपल्या सुनेचे, आपल्या भावजयीचे, आपल्या जावेचे काय झाले आहे हे जाणून घेण्यात कोणालाच रस नव्हता. काहीही करा, फक्त आमची किडनी तेवढी मागू नका, एवढेच त्यांचे म्हणणे होते.
न मिळालेल्या एका किडनीमुळे नव्हे; तर न मिळालेल्या आपल्या माणसांच्या प्रेमामुळे ती लवकरच न परतीच्या प्रवासाला निघून गेली होती.
प्रसंग तिसरा-
हाही माझ्या आंतरवासिते-दरम्यानचाच!
मी शल्यचिकित्सा (सर्जरी) वॉर्डमध्ये ड्यूटीवर होतो.
समोरच्या मेडिसीन वॉर्डमध्ये माझा एक ज्यूनियर बॅचमेट ड्यूटीवर होता.
वॉर्डमध्ये रेसिडेंट डॉक्टर ७.३०-८.०० च्या आसपास राउंड घ्यायचे. त्याच्याआधी वॉर्ड ड्यूटीवर असणाऱ्या इंटर्नने राउंड घेणे आवश्यक असायचे.
पेशंट्सच्या संख्येनुसार सकाळी ६.१५-६.३० वाजता इंटर्न्स राउंड घेत असत.
त्यानुसार मी राउंड घेतला. मग, माझा राउंड घेऊन झाल्यावर मी सहज मेडिसीन वॉर्डमध्ये चक्कर टाकावी म्हणून गेलो.
त्या इंटर्न डॉक्टरचा राउंडही संपत आला होता.
पण, मी एक निरीक्षण केले.
तो ज्यूनियर डॉक्टर, पेशंट्सना न तपासताच वॉर्डच्या काउंटरवर बसून पेशंट्सचे 'व्हायटल्स' (Vitals) म्हणजे हृदयाची गती (छातीचे ठोके)(Pulse), ब्लड प्रेशर (B.P.) आणि श्वासाची गती (Respiratory Rate) पेशंट्सच्या फाईलमध्ये नोंदवत होता.
मी त्याला म्हटलेही की, "अरे, पेशंट्सना तपासून लिही ना." त्यावर तो उत्तरला, "अहो सर, काय फरक पडतो? वॉर्डमध्ये कुठे सीरियस पेशंट्स असतात? सगळे स्टेबल आहेत...मी रात्री घेतलेत ना सर्वांचे व्हायटल्स!"
यावर मी त्याच्यासारखाच एक इंटर्न असल्याने त्याला अधिकारवाणीने काही सांगू शकलो नाही.
मी विषय तिथेच सोडून दिला.
७.३० वाजण्याच्या आसपास आम्ही सिस्टरांना सांगून चहा प्यायला निघालो. कॅन्टीन जवळच होते.
चहाचा पहिला घोट घेणार तोवरच त्याच्या मोबाईलवर वॉर्डमधील सिस्टरांचा फोन आला. त्या म्हणाल्या, "सर, १८ नंबर बेडवरच्या पेशंटला धाप लागलीय. त्या बाई कशातरी करताहेत, तुम्ही लवकर या."
आम्ही चहाचे कप तसेच ठेऊन पटकन वॉर्डकडे जायला निघालो.
आम्ही वॉर्डच्या दारात पोहोचतानाच त्या पेशंटला रेसिडेंट डॉक्टर, आय. सी. यू. इंटर्न आणि असिस्टंट (मदतनीस) घाईघाईने अतिदक्षता विभागाकडे घेऊन जाताना आम्हाला दिसले.
आम्हीही त्यांच्या मागोमाग अतिदक्षता विभागाकडे निघालो.
माझी काही त्या वॉर्डला ड्यूटी नव्हती; पण नवीन काहीतरी शिकायला मिळेल म्हणून मी तिथेच थांबलो.
तासभर खूप प्रयत्न केल्यावरही ती पेशंट वाचू शकली नाही.
तिचा १६ वर्षांचा मुलगा मोठमोठ्याने रडत होता. रडता रडताच तो म्हणत होता, 'तरी मी या डॉक्टरांना सांगत होतो की, माझी आई पहाटेपासून कशीतरी करत आहे, तिला नीट श्वास घेता येत नाहीए, तिला गुदमरल्यासारखं वाटतंय. पण, या डॉक्टरांनी माझं ऐकलं नाहीत. ते माझ्या आईकडे फिरकलेही नाहीत. सिस्टरांना सांगितलं तर त्या म्हणाल्या की, आता ८ वाजता मोठे डॉक्टर राउंडला येतील. त्यांना काय सांगायचं ते सांग. या डॉक्टरांनी एकदा जरी माझ्या आईला तपासलं असतं तरी माझी आई वाचली असती.'
माझा तो ज्यूनियर बॅचमेट आता खाली मान घालून उभा होता.
त्या मुलग्याचे म्हणणे बरोबर होते.
त्या इंटर्नने त्या मुलाच्या आईच्या श्वासाची गती केवळ एक मिनिटासाठी मोजली असती तर, ती पेशंट वाचली असती की नाही माहित नाही, पण कमीत कमी २ तास आधी तिची प्रकृती गंभीर होत असल्याचे तरी निदान कळाले असते...आणि, कदाचित मग तिचा जीव वाचवता आला असता.
तिच्या जाण्याने आता एक संसार उद्ध्वस्त झाला होता..! तिची मुलंबाळं उघड्यावर पडली होती.
आणि, तो इंटर्न दुसऱ्याच दिवशी त्याच कॅन्टीनमध्ये टाळ्या देत आणखीन एका बॅचमेटसोबत चहा-बिस्कीटे खात बसला होता..!
प्रत्येकाला फक्त स्वतःचा जीव प्यारा. दुसऱ्याच्या जिवाचे कधी ना मोल जाणलेे, ना जाणण्याचा प्रयत्न केला!
जगातील सर्वांत मोठा मेंदू घेऊन फिरणाऱ्या माणसांची गत मात्र स्वतःचा जीव वाचविण्यासाठी स्वतःच्या पिल्लाला पायाखाली घेणाऱ्या त्या माकडिणीच्या गोष्टीसारखीच!
माकडाचा माणूस झाला; पण माणूसपण मात्र आलेच नाही!!!
प्रसंग चौथा-
मी त्यावेळी कोल्हापूर जिल्ह्यातील एका ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होतो.
वेळ रात्री ११.३० वाजताची. त्या दिवशी खूप जास्त काम झाले होते.
दिवसाची सुरुवातच शवविच्छेदनाने झाली होती. पाण्यात बुडून मृत्यू पावलेली ती एक महिला होती. कुठल्यातरी जवळच्या नातेवाईकाचे लग्न होते म्हणून सकाळीच उठून ती कामाला लागली होती. अंघोळीला पाणी पाहिजे होते म्हणून ती विहीरीत पाणी काढायला उतरली होती. नंतर, वर मात्र सरळ तिचा मृतदेह काढला गेला. चुलीवर शिजवायला ठेवलेला भात तसाच होता. भात शिजू घालताना ती जिवंत होती; तो शिजेपर्यंत ती मात्र हा इहलोक सोडून निघून गेली होती. तिच्या शवविच्छेदनाने दिवसाची सुरुवात झाली.
दिवसभर बाह्यरुग्ण विभागात पण रुग्णांची बरीच गर्दी होती. मग एक ९० वर्षांच्या आजी आल्या. त्या जिन्यावरून पडल्या होत्या. नंतर, अपघातात गंभीररीत्या जखमी झालेले २ रुग्ण आले.
सकाळी ६.३० वाजल्यापासून मी सतत कामात होतो. दुपारी आमच्यापैकी एकाने भात शिजवला होता; पण एकालाही तो धडपणे खाता आला नाही. सगळेच दिवसभर उपाशी. त्यावेळी मी दुर्गम भागात कार्यरत होतो (आत्ताही दुर्गम भागातच आहे.), त्यामुळे स्वतः शिजवून खावे लागायचे.
अखेरीस एकदाचे रात्री ११ वाजता आम्ही सगळे 'रिलॅक्स' झालो. आता तरी पोट भरून डाळ-भात-लोणचे खाऊ असा विचार करून आम्ही सगळे मांडी घालून गप्पा मारत जमिनीवर बसलो. प्रत्येकाच्या ताटात डाळ-भात वाढला गेला.
पण, हाय रे कर्मा!
पहिला घास हातातून तोंडात जातो न जातो तोच वॉचमन पळत पळत धापा टाकत आला. "सर, चला लवकर; अर्जंट आहे," तो म्हणाला.
सर्वांनी एका क्षणात हातातले घास तसेच ताटात टाकले आणि हात धुवून आम्ही क्षणार्धात 'कॅज्युल्टी' (दुर्घटना) विभागात पोहोचलो.
अंदाजे ४५ वर्षे वयाची एक महिला होती. तिला श्वास घ्यायला त्रास होत होता. तिच्याबरोबर कमीत कमी ४०-५० लोक आले होते. ७-८ गाड्या बाहेर कँपसमध्ये लागल्या होत्या.
पाहताक्षणीच अंदाज आला की, काहीतरी गंभीर प्रकार घडला आहे.
२ मिनिटांत सगळी गर्दी कमी केली. (गर्दीमुळे रुग्णालाच त्रास होतो हे आपल्या लोकांना का कळत नाही, हे एक कोडेच आहे. आणि, गर्दी मदतही करत नाही- फक्त बघ्याची भूमिका घेऊन ढिम्मपणे उभी असते.) ३-४ लोकच जवळ ठेवले.
पटकन 'हिस्ट्री' विचारली. आधी सगळेजण एकसुरात म्हणाले की, 'काही नाही सर. अचानकच त्रास सुरू झालाय.' मला ते पटले नाही आणि मी माझी नाराजी लगेच दाखवूनही दिली. ते बहुधा त्यांच्यातील एक-दोघांच्या लक्षात आले.
ते म्हणाले, "सर, डॉक्टरांपासून काय लपवायचे? तिच्या नवऱ्याने तिचा गळा दाबून खून करायचा प्रयत्न केला आहे."
मी बोलत बोलत उपचार चालू केले होते. पोलिसांनाही पटकन कळवून टाकले. माझ्या रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांनाही मी कल्पना दिली. (रुग्णालयात मी एकटाच डॉक्टर त्यावेळी ड्यूटीवर होतो.)
तिला श्वास घ्यायला खरेच त्रास होत होता. बोलताही येत नव्हते. एकतर श्वासनलिकेवर जोरदार मार लागला होता आणि दुसरे म्हणजे, तिला जबरदस्त मानसिक धक्का बसला होता. माझ्याकडे व्हेंटिलेटर नव्हता. पण, नकारघंटा वाजवण्यापेक्षा रुग्णाचा जीव वाचविण्यासाठी आहे त्यात सर्वोत्तम उपचार डॉक्टरांनी केले पाहिजेत अशा मताचा मी आहे.
आम्ही अम्बुबॅगने तिच्या श्वसनाला मदत द्यायला सुरू केले. घशाची सूज पटकन कमी होऊन श्वसनमार्ग खुला होण्यासाठी स्टेराॅइड्सचे इंजेक्शन्स आणि बाकीची शक्य तेवढी औषधे दिली.
तिचा त्रास हळूहळू कमी झाला. पण, श्वसननलिकेचा दाह होऊन सूज आणखीन वाढण्याची भीती होती; म्हणून रुग्णाची तब्येत स्थिर झाल्यावर तिला पुढील उपचारासाठी कोल्हापूरच्या सी. पी. आर. रुग्णालयात पाठविण्याचा मी निर्णय घेतला.
तेवढ्यात जबाब नोंदविण्यासाठी पोलिसही आले. तिची तब्येत थोडी स्थिर झाल्याने मी पोलिसांना मोजकेच प्रश्न विचारण्याची परवानगी दिली...आता धक्का बसण्याची वेळ माझी होती.
पोलिसांनी तिला तिची ही अवस्था कशी झाली हे विचारले असता, तिने आपल्या जबाबात कुठेही नवऱ्याने मारहाण केल्याचा उल्लेख केला नाही. मी स्वतः गळफास लावून घेतला असे धादांत खोटे तिने सांगितले. तिच्या सख्ख्या भावाने तिचा गळा दाबताना तिच्या नवऱ्याला पाहिले होते. तो हे पोलिसांना सांगत होता, मात्र तिने असे काहीच सांगितले नाही. तिचा नवरा तिला रोज मारहाण करतो हे शेजाऱ्यांना माहिती असल्यानेच ते सगळे गाड्या भरून तिच्या नवऱ्याला धडा शिकविण्यासाठी तिथेपर्यंत आले होते.
आत्महत्येचा प्रयत्न करून जिवंत राहिलेल्या व्यक्तीला आय. पी. सी. कलम ३०९ अंतर्गत एक वर्ष कैदेची शिक्षा होते, त्यामुळे खरे काय ते सांगा असे पोलिसांनी सांगूनही तिने तिचा जबाब बदलला नाही.
मृत्यूच्या दारात असलेला रुग्ण किंवा व्यक्ती खोटे बोलत नाही असे भारतीय कायदा मानतो आणि न्यायालयेही ही बाब पुरावा म्हणून बऱ्याच प्रकरणात मान्य करतात. असे असूनही 'ती' मात्र तिच्या म्हणण्यावर शेवटपर्यंत ठाम राहिली. तिच्या नवऱ्याला धडा शिकवायला आलेल्या सर्वांचाच हिरमोड झाला.
माझ्या डोक्यात मात्र या घटनेला ४ वर्षे होऊन गेल्यानंतरही राहून राहून एकच विचार येतो की,
'स्वतःचा जीव जाईपर्यंत नवऱ्याच्या हातून मार खाल्लेली स्त्री इतकी पतिनिष्ठ कशी काय राहू शकते?
तिच्या पतिनिष्ठेचे कोणते बक्षीस तिच्या नवऱ्याने तिला आजपर्यंत दिले असेल?
तिची 'ही' पतिनिष्ठा हा तिच्या सहनशक्तीचा विजय आहे की पराभव?
तिची 'ही' पतिनिष्ठा ही भारतीय संस्कृतीच्या मूल्यांचा विजय आहे की पराभव?
तिची 'ही' पतिनिष्ठा स्त्रियांच्या २१ शतकातील स्थितीची निदर्शक आहे की अपवाद?
'स्त्रीमुक्ती' आणि 'स्त्रियांना समाजात समानाधिकार आणि सन्मान' ह्या गोष्टी केवळ बोलायच्या आहेत की खरेच त्या समाजात रुजल्या आहेत? त्या रुजवण्यात आपण खरेच कितपत यशस्वी झालो आहोत?
स्त्रियांच्या सामाजिक उन्नतीचा प्रयत्न करणे ही यावर आपण भर दिला; पण पुरुषांच्या सामाजिक, मानसिक आणि बौद्धिक उन्नतीसाठी आपण काही केले का? मुळात, या सगळ्यांची तीव्रतेने निकड आपल्याला भासली का?
त्याहूनही पुढे जाऊन मी म्हणेन की, स्त्रीची सामाजिक स्थिती सुधारण्यासाठी आपण प्रयत्न करत आहे; पण तिची मानसिक उन्नती आपण कशी साधणार?'
असंख्य प्रश्न अजूनही माझ्या मेंदूत किड्यासारखे वळवळताहेत..!
ताजा कलम,
प्रसंग पाचवा-
आज मी ड्यूटीवर नाहीए.
मी माझ्या दुसऱ्या एका डॉक्टर मित्राकडे आलोय.
तो आज कॅज्युल्टी (दुर्घटना) विभागात ऑन-कॉल आहे.
स्थळ- कोल्हापूरचे सी. पी. आर. हॉस्पिटल; वेळ- दुपारची.
कॅज्युल्टीच्या थोडीशी बाहेर चहाची टपरी आहे. आम्ही दोघे चहा घेत गप्पा मारतोय. तेवढ्यात रुग्णवाहिका प्रवेशद्वारातून सायरन वाजवत आत येते.
दोन रुग्ण आहेेत. त्यांना स्ट्रेचरवरून पटकन आत नेले जातंय.
तेवढ्यात इंटर्नचा मित्राला फोन येतो. आमचाही चहा झालाय.
आम्ही कॅज्युल्टी विभागापासून केवळ ५०-६० मीटरवर आहे; त्यामुळे पटकन दुर्घटना विभागात पोहोचतो.
ते नवरा-बायको असल्याचे पोलिस सांगतात. नवरा एकदम सीरियस. अगदी मृत्यूच्या दारात. बायकोला फक्त खरचलंय.
दोघांवरही लवकरात लवकर उपचार चालू केले जातात. नवऱ्याला पुढील उपचारासाठी मेंदूविकार शल्यचिकित्सकाकडे (न्यूरोसर्जन) पाठविण्याचा निर्णय सर्जन घेतात. त्याला पुढे पाठविले जाते. बायकोला स्त्री शल्यचिकित्सा विभागात भरती केले जाते. संध्याकाळच्या राउंडला आम्हाला तिला अपघात नक्की कसा झाला हे विचारायचा मोह आवरत नाही.
ती सांगते, "अॅक्सिडेंट कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावर कोल्हापूरपासून केवळ १० किमी अंतरावर झाला. आम्ही पाहुण्यांकडे कार्यक्रमासाठी निघालो होतो. रविवार असल्यामुळे रस्त्यावर वाहनांची गर्दी होती. एक वडापवाला मागून जोरात आला. त्याचा धक्का लागला. आमची दुचाकी (मोटरसायकल) पडली. आम्ही दोघेही गाडीच्या खाली आलो, त्यामुळे उठता येईना. आमच्या ह्यांच्या डोक्यातून रक्त येत होते. तरीही त्यांनी तशा अवस्थेत वरच्या खिशात ठेवलेला मोबाईल काढला. घरच्या कुणाला तरी फोन करावा म्हणून प्रयत्न केला. परंतु नंबर काही केल्या लक्षात येईना; मुळात फोनचे लॉक एका हाताने काढता येईना. कोणीच गाडी थांबवत नव्हते. म्हणून मग मोबाईल तसाच हातात घेऊन तो हात हलवायला सुरू केले. दुसरा हात अंगाखाली अडकला होता. ५-७ मिनिटे गेल्यावर एक दुचाकी थांबली. त्यावर दोन तरूण होते. ते जवळ आले. आमच्या जिवात जीव आला. त्यांना म्हटले पोरांनो गाडी तेवढी लवकर अंगावरून काढा, जीव गुदमरलाय. ते आणखीन जवळ आले. त्यांच्याजवळ गेले. हातातला मोबाईल काढून घेतला. ह्यांच्या खिशातले १००० रुपये काढून घेतले आणि ते दोघेही तसेेच मागे वळून गाडीला किक मारून पळून गेले. खूप वेळाने पोलिस आले आणि मग अॅम्ब्युलन्स बोलावून आम्हाला इथे आणले.' "त्या पोरांचं काही चांगलं होणार नाही. ती दोघे पण अशीच तडफडून मरतील", तिने शाप दिला.
कलियुगात शाप लागत नाही आणि आशीर्वाद लाभत नाही असे म्हणतात.
वेळीच उपचार मिळाले असते तर तिचा नवरा एवढा सीरियस झाला नसता. तो वाचला ही गोष्ट वेगळी.
ते दोघेही वाचले; पण त्यांच्या दोघांच्याही भावना मात्र मरून गेल्या.
आमच्यातही संताप आणि हतबलता या परस्परविरोधी भावना एकाच वेळी जागृत करून, ते दोघे आमच्या नाकावर टिच्चून एक जोरदार ठोसा मारून निघून गेले होते..!
(©डॉ.अमित सुमन तुकाराम पाटील,
वैद्यकीय अधिकारी गट 'अ')
(© सर्व हक्क लेखकाकडे सुरक्षित)
(प्रस्तुत लेखक मान. श्री. आर. आर. (आबा) पाटील, माजी उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांचे सख्खे भाचे आहेत.)

अमित खूप छान अनुभव कथन..अंगावर काटा येतो..माणुसकी हरवत चालली आहे..आणि आता ती घरापर्यंत आली आहे हे जाणवते..छान विषय मांडला आहेस.विषयांचे वर्णन अगदी पूरक.
ReplyDeleteअतिशय विदारक पण अंतर्मुख करायला लावणारी कथा , अनेक अपघात प्रसंगी हाच अनुभव येतो , हल्ली तर समाज माध्यमामुळे परिस्थिती अजून जास्त विदारक झाली आहे लोक मदत करण्या पेक्षा व्हिडिओ काढून समाज माध्यमांवर टाकण्यात जास्त धन्यता वाटते ।
ReplyDelete