बुद्धिबळ विश्वचषकाच्या निमित्ताने... (Regarding Chess World Cup...)
बुद्धिबळ विश्वचषकाच्या निमित्ताने...
(© डॉ. अमित सुमन तुकाराम पाटील)
*आपण भारतीय लोक लगेच भावनिक होतो.* काल चांद्रयान पोहचतंय न पोहोचतंय तोवरच भारतीय लोकांनी ‘प्रज्ञानंद विश्वचषक विजेता झाला; भारताला एकदम दोन ‘गुड न्यूज’ मिळाल्या’ असे स्टेटस ठेवायला सुरुवात केली. (दुर्दैवाने यातल्या बव्हंशी लोकांना बुद्धिबळाची विश्वचषक स्पर्धा आणि विश्व अजिंक्यपद स्पर्धा यांतील फरकही माहिती नाही.)
मॅग्नस कार्लसन हा काही साधासुधा खेळाडू नाही. प्रज्ञानंदने ‘फायनल’ला त्याच्यासमोर खेळणे हे नक्कीच मानाचे आहे. ५ वेळचा माजी विश्व बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेचा जगज्जेता (आणि लाडका) विश्वनाथन आनंद त्याच्याबरोबर (मॅग्नसबरोबर) दोन विश्व अजिंक्यपद स्पर्धा खेळला आहे. पण, तो काही कार्लसनला नमवू शकला नाही. उलट आनंदचा तसा दारुण पराभव झाला.
कार्लसनविरुद्ध एखादी मॅच जिंकणे वेगळे आणि विश्वचषक किंवा विश्व अजिंक्यपद स्पर्धा त्याच्याविरुद्ध जिंकणे वेगळे!
मॅग्नस कार्लसन हा ‘मशीन’पेक्षा काही कमी नाही. उलट, कोणत्याही संगणकापेक्षा त्याची बुद्धिमत्ता अतिअचाट आहे.
या स्पर्धेत कार्लसन त्याच्या नेहमीच्या फॉर्ममध्ये वाटला नाही. विश्व अजिंक्यपद स्पर्धेत तो कोणताही सामना किमान ६ तासांपेक्षा पुढे नेतो आणि प्रतिस्पर्ध्याला गाळायलाही घाम शिल्लक राहू नये याची तजवीज तो करतो. ‘ड्रॉ’ होण्याची खात्री असलेल्या मॅचेस लांबवत नेऊन त्या ‘जिंकणे’(च) हा त्याचा USP आहे. ड्रॉ वगैरे तो सहजासहजी स्वीकारत नाही.
प्रज्ञानंद उत्तम खेळतो यात वादच नाही. *डी. गुकेश, अर्जुन एरिगेसी, पी. हरिकृष्णा, विदित गुजराती आणि प्रज्ञानंद हे अत्युत्कृष्ट खेळाडू आहेत.* यातील पी. हरिकृष्णा वगळता बाकी सगळ्या खेळाडूंच्या बाजूने त्यांचे वय आहे. तिघेही १८ वर्षांचे आहेत. तिघांपैकी एकजण किंवा तिघेही आलटून-पालटून भविष्यात केवळ विश्वचषकच नव्हे; तर जगातील सर्वांत मोठी असणारी *विश्व अजिंक्यपद स्पर्धा जिंकेल/ जिंकतील* याची खात्री बाळगायला हरकत नाही! *_तूर्तास प्रज्ञानंदचे मनःपूर्वक अभिनंदन! बंदे में दम है!!_*
पण, *कार्लसन हा बुद्धिबळातला the beast and the best आहे*; आणि तो खेळेल तोपर्यंत तो सर्वोच्च स्थानीच विराजमान असेल यात शंकाच नाही. _२०१३-२०२३ या १० वर्षांत त्याने मानाच्या सर्व स्पर्धांसह एकूण *५ वेळा विश्व अजिंक्यपद स्पर्धा* जिंकली आहे आणि सलग *१० वर्षांपेक्षा जास्त वर्षे तो जागतिक मानांकनात अग्रस्थानी* आहे. *सलग १२५ मॅचेस न हारण्याचा विक्रम* त्याच्या नावावर आहेच, शिवाय बुद्धिबळाच्या *विश्व जलद आणि अतिजलद स्पर्धांचा तो एकापेक्षा जास्त वेळा विजेता* राहिलेला आहे. बुद्धिबळाच्या Live Elo Rating मध्ये त्याने *२८८९ एलो गुणांकन* प्राप्त केले आहे; जे बुद्धिबळाच्या आजवरच्या इतिहासातील *सर्वोच्च मानांकन* आहे. इतकेच नव्हे, तर बुद्धिबळाच्या विश्व अजिंक्यपद स्पर्धेदरम्यान (म्हणजे लढत चालू असताना) चक्क २०-२५ मिनिटे झोपणारा मॅग्नस कार्लसन हा एकमेव खेळाडू आहे. बुद्धिबळातील सगळं काही मिळविल्यावर आता नवीन काय target ठेवावे म्हणून मॅग्नस कार्लसनने २९०० एलो रेटिंग मिळविण्याचे ध्येय समोर ठेवले आहे. *१९० च्या आसपास अंदाजित बुद्ध्यांक (IQ)* असणारा हा खेळाडू आपल्याला आपल्या आयुष्यात live खेळताना पहायला मिळतो हे आपले अहोभाग्यच जणू!
*फुटबॉलमध्ये मेस्सी-रोनाल्डो असतील; क्रिकेटमध्ये तेंडुलकर-कोहली असतील; पण _वेगवान धावण्यात उसेन बोल्ट आणि बुद्धिबळात मॅग्नस कार्लसन केवळ एकमेवच आहेत आणि असतात_!!!* प्रज्ञानंदने कमी वयात विश्वचषक स्पर्धेचा उपविजेता होण्याचा मान मिळविला आहे; पण *मॅग्नसने त्याच्या कमी वयात बुद्धिबळात काय काय क्रांती केली आहे हे वाचले की कुणाचेही डोळे पांढरे होतील*!
_गेल्या १० वर्षांत तुल्यबळ प्रतिस्पर्धी नाही या केवळ एकमेव कारणाने *कंटाळा येऊन* विश्व अजिंक्यपद स्पर्धेत सहभागी न होणारा मॅग्नस कार्लसन हा सहस्रकात एकदाच जन्माला येणाऱ्या खेळाडूंपैकी एक आहे_!!!
(© डॉ. अमित सुमन तुकाराम पाटील,
एम.बी.बी.एस., एम.डी. (बालरोग चिकित्साशास्त्र),
मोबा. 8329381615)
धन्यवाद अमित सर, ऊत्कृष्ट संकलन, हे माहितच नाही आम्हाला.आपण नेहमीच अभ्यासू लेख लिहीत असता.आपल्या लेखनीतून अशीच माहिती मिळत राहो.keep writing.
ReplyDeleteसर उत्तम माहिती संकलन करून आमच्या ज्ञानात भर घेतली 🙏अतिशय उत्तम माहिती आहे 💐👍
DeleteThank you very much!
DeleteMany congratulations for sharing such a nice information regarding this Great player of Chess
ReplyDeleteThanks a lot!
Deleteअतिशय सुंदर आणि अभ्यासपूर्ण लेख सर !
ReplyDeleteThank you Madam!
Delete